Home /News /maharashtra /

धुळ्यात पुन्हा घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

धुळ्यात पुन्हा घडलं थरकाप उडवून देणारं हत्याकांड, गँगवॉरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

राहुलवर चार गोळ्या फायर करण्यात आल्या. नंतर धारदार चॉपरने देखील त्याच्यावर वार करण्यात आले.

धुळे, 18 जुलै: धुळे शहरालगत असलेल्या मोहाडी उपनगर परिसरात पुन्हा एकदा थरकाप उडवून देणारं हत्याकांड घडलं आहे. शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या गँगवॉरमध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. राहुल मिंड असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्यावर हल्लेखोरांनी चार गोळ्या घातल्या. नंतर त्याच्यावर चॉपरनेनही सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले आहेत. या हत्याकांडाने गुड्ड्या मर्डर केसची सगळ्यांना आठवण करून दिली असावी. हेही वाचा...माणुसकीला काळिमा! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं मिळालेली माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून झालेल्या टोळीयुद्धात राहुल मिंड या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. राहुलवर चार गोळ्या फायर करण्यात आल्या. नंतर धारदार चॉपरने देखील त्याच्यावर वार करण्यात आले. दोन गट एकमेकांवर हत्यार घेऊन चालून आले. पूर्व वैमनस्यातून झालेल्या या वादामुळे मोठी खळबळ उडाली. राहुल हा आपल्या काही साथीदारांसोबत लळींग टोल नाक्याजवळील हॉटेलमध्ये बसला होता. त्या वेळी जुना वाद असलेली टोळी चाल करून आली. राहुल त्यांच्या तावडीत सापडला. यावेळी दिवसधवड्या लाठ्या काठ्यांसह तलवारी व हत्यारांचा सर्रासपणे वापर करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. हेही वाचा...भयंकर! गुप्तांगावर लोखंडी गजाने वार करून एकाचा खून, विवस्त्र अवस्थेत शेतात फेकलं राहुल मिंड हा टोळीयुद्धाचा बळी ठरला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान घटनेनंतर हल्लेखोर टोळी पसार झाली आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. मात्र, या थरारक घटनेमुळे मोहाडी उपनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Murder news

पुढील बातम्या