रायगड, 04 एप्रिल : रायगड (raigad) जिल्ह्यातील शिहू बेणसे भागातील डोंगर माथ्यावर असलेल्या करकरणी देवीच्या मंदिर परिसरातील घनदाट जंगलात रविवारी एका महिलेला ठार (murder) मारून पेट्रोल (petrol) टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली. पण दोन तरुणांनी दाखवलेले धाडस व तत्परता यामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली आहे. आरोपीच्या मोटारसायकल क्रमांकावरून नागोठणे पोलिसांनी गुन्ह्याचा तात्काळ छडा लावला, अवघ्या चार तासात आरोपीला बेड्या ठोकण्याची दमदार कामगिरी पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिहू बेणसेमधील रिलायन्स टाउनशिप गेटसमोरील डोंगरमाथ्यावर श्री करकरणी देवीचे प्रसिद्ध मंदिर असून याठिकाणी भाविक सातत्याने मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत जात असतात. येथील सभोवतालचा परिसर घनदाट जंगलभागाने व्यापला आहे. या घनदाट जंगलाचा फायदा घेऊन महिलेला ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
(pbks कडून मैदानात उतरलेला हा नवखा क्रिकेटर ठरला हिरो)
याबाबत फिर्यादी जयेश यशवंत घासे व नागोठणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 3.00 ते 7.00 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय 22, राहणार उनाटवाडी) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम एच 04 FN 4496 घेऊन करकरणी मंदिर परिसरात आला होता. जंगलामध्ये मंदिरामध्ये गेले होते. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. पण, तिथे गेल्यावर दोघांमध्ये वाद झाला.
(तुमच्या जवळपास स्वस्त पेट्रोल-डिझेल कसं शोधणार; 'या' अॅप्सद्वारे लगेच कळेल)
या वादातून आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या चुलत आत्याला बेदम मारहाण करून जीवे ठार मारले. त्यानंतर कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून आरोपी विजय शिदने दुचाकीमधील पेट्रोल आणण्यासाठी खाली आला होता. त्यावेळी तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्याला पाहिले. त्याच्या हालचालीवरून संशय आला म्हणून त्यांनी दुचाकीचा फोटो काढून ठेवला. पण काही तरी चुकीचं घडत असल्याचा संशय बळावला म्हणून दोघांनी त्याचा पाठलाग करून जंगलात गेले. त्यावेळी धूर दिसून आला. आरोपीने पेट्रोल टाकून मृत महिलेचा मृतदेह पेटवून देऊन पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्वत: जंगलात जाऊन घटनास्थळी ठिकाणी पाहणी करून नमुने घेऊन फॉरेन्सिक ला पाठवले आहेत आणि चार तासात आरोपीला अटक केले आहे आणि मोटारसायकल ही ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.