Home /News /maharashtra /

काळ्या जादूचा वापर करून 22 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून, वर्ध्यातील घटना

काळ्या जादूचा वापर करून 22 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून, वर्ध्यातील घटना

गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता.

गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता.

गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता.

    नरेंद्र मते, प्रतिनिधी आर्वी, २० मे - उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करून एका 22  वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून (murder) केल्याची घटना वर्धा (wardha) जिल्ह्यातील आर्वी येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून त्याचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला. अब्दुल रहीम अब्दुल मजिद (६०) अब्दुल जुनेद अब्दुल रहीम (२२) अब्दुल जमीर अब्दुल रहीम (२०) रा. सर्व विठ्ठ वॉर्ड आर्वी अशी या आरोपींची नावे आहेत. तर, गणेश _काराम सोनकुसरे (४९) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे.

    (सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral;ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री)

    गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होता. त्याला या तिन्ही आरोपींकडे उपचाराकरिता आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून तरुणाचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून केला. यानंतर, तरुणाचा मृतदेह पोलिसांना कोणतीही माहिती देता दबाव टाकत वडिलांकडे सोपवत पुरावा नष्ट केला. याप्रकरणी वडील गणेश सोनकुसरे यांनी अमरावती कोतवाली पोलिसात तोंडी रिपोर्ट दिली.पोलिसांनी प्रॉव्हिजनल रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला तसेच आर्वी पोलिसांत माहिती देऊन तेथेही गुन्हा नोंदविण्यात आला. (कुटुंबासाठी मुंबईचे बदमाश तुमची ट्रेन करत होते लेट; कांड पाहून पोलीसही चक्रावले) घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके ठाणेदार भानुदास पिदुरकर फौजदार हर्षल नगरकर यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक बांबर्डे यांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर करीत आहे.
    First published:

    पुढील बातम्या