Home /News /entertainment /

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral; ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral; ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral;ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral;ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni) कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्यासोबत तिने गेल्याच आठवड्यात पुन्हा लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर दोघं मेक्सिकोमध्ये (Mexico) हनिमून एन्जॉय (Sonalee Kulkarni Honeymoon) करत आहेत. नुकताच सोनालीने त्यांचा ड्रोन शॉर्ट व्हिडीओ शेअर केला आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 20 मे:  मराठी चित्रपटसृष्टीतली ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सध्या आपल्या पतीसोबत हनिमूनला गेली आहे. कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्यासोबत तिने गेल्याच आठवड्यात पुन्हा लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर ती दोघं मेक्सिकोमध्ये (Mexico) हनिमून एन्जॉय (Sonalee Kulkarni Honeymoon) करत आहेत. काही दिवसांपासून ती आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून  फोटोज शेअर करत आहे. नुकताच तिने आपल्या पतीसोबतचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. काय आहे या व्हिडिओत? सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती मेक्सिकोतल्या एका बीचवर (Sonalee Kulkarni on Beach) असल्याचं दिसत आहे. यामध्ये सोनाली बिकिनीमध्ये दिसत आहे, तर तिच्या पतीने गुलाबी रंगाचा एक शर्ट आणि शॉर्ट्स घातली आहे. हा व्हिडिओ ड्रोनने शूट (Drone Shot) केलेला आहे. यामध्ये सुरुवातीला ती दोघं कॅमेऱ्याच्या अगदी जवळ आहेत, तर काहीच क्षणांमध्ये हे ड्रोन त्यांच्यापासून भरपूर उंचीवर जातं. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचा समुद्रकिनारा, रिसॉर्ट आणि क्षितिजापर्यंत पोहोचलेलं निळंशार पाणी असं विलोभनीय दृष्य आपल्याला दिसतं.
व्हिडिओला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद या व्हिडिओला तिने ‘पॅराडाइज!’ अशी कॅप्शन दिली आहे. सोबतच कॅप्शनमध्ये तिने व्हिडिओ बनवणाऱ्या @murph_holbox यांचे आभार मानले आहेत. तसंच आपल्या कॅप्शनमध्ये तिने हनिमून डायरीज असा हॅशटॅग वापरला आहे. तिच्या या पोस्टवर प्रार्थना बेहेरे, रसिका सुनिल अशा सेलिब्रिटीजनी कमेंट्स केल्या आहेत. सोबतच, सोनालीच्या चाहत्यांनीही तिच्या या पोस्टवर (Sonalee Kulkarni instagram) लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एकटीच्या फोटोमुळे झाली ट्रोल सोनालीने हनिमूनला गेल्यापासून स्वतःचे बिकिनीमधले फोटोज आणि व्हिडिओज फॅन्ससोबत शेअर केले होते. हनिमूनला असूनही केवळ एकटीचेच फोटो शेअर करत असल्यामुळे तिला सुरुवातीला थोडंफार ट्रोलही करण्यात आलं; मात्र नंतर तिने आपल्या पतीसोबत किस (Sonalee Kulkarni with husband) करतानाचा फोटो पोस्ट करून ट्रोलर्सचं तोंड बंद केलं होतं. दोन वेळा केलं लग्न सोनाली आणि कुणाल गेल्या वर्षीच (7 मे 2021) दुबईमधल्या एका मंदिरात लग्नबंधनात अडकले होते. या लग्नाला दोघांचेही आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने दोघांना आशीर्वाद दिले होते. कोरोना परिस्थितीमुळे साध्या पद्धतीनेच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यानंतर या वर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. हा लग्नसोहळा लंडन येथे काही मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार (Sonalee Kulkarni second marriage) पडला. या वेळी हा लग्न सोहळा ख्रिश्चन पद्धतीनेदेखील पार पडला होता.
First published:

Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

पुढील बातम्या