भोपाळ, 20 मे : गेल्या काही दिवसांत बऱ्याच ट्रेनच्या वेळा बदलण्यात आल्या. ट्रेन उशिराने चालत होत्या. तुमची ही ट्रेन लेट करण्यासाठी कारणभीत ठरले त्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत
(Train late reason). त्यांनी ट्रेन उशिरा करण्यासाठी जे केलं आणि त्यामागील कारण जेव्हा समजलं तेव्हा पोलीसही चक्रावले. फक्त आपल्या कुटुंबाला भेटता यावं म्हणून मुंबईच्या दोन बदमाशांनी हे कांड केलं होतं
(Train bomb rumors accused arrested). तीन-तीन राज्यांचे पोलीस या बदमाशांच्या शोधात होते
(Bomb in train rumors).
दोन दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या उज्जैन रेल्वे स्टेशनवर बुधवारी गोरखपूर-वांद्रे ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जीआरपीला मिळाली. आधी 11 मे आणि आता 18 मे रोजी रात्री अफवा पसरवणारं ट्विट त्यांनी केलं होतं. गेल्या काही दिवसांत ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याच्या बातम्यांनी खळबळ माजवली. सोशल मीडिया ट्विटरवर मिळालेल्या माहितीनुसार तातडीने पावलं उचलण्यात आली. ट्रेनच्या वेळा बदलण्यात आल्या, ट्रेनची तपासणी करण्यात आली. पण शेवटी हाती काहीच लागलं नाही. ट्रेनमध्ये बॉम्ब काय स्फोटाकासारखं संशयास्पद काहीच सामान सापडलं नाही. शेवटी ही अफवा असल्याचं समजलं आणि अशी अफवा पसरवणाऱ्याचा शोध सुरू झाला.
महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशमध्ये या तीन-तीन राज्यांच्या पोलिसांना या बातमीने हैराण करून सोडलं आणि या तिन्ही राज्यांचे पोलीस त्या आरोपीच्या शोधात होते. अखेर तो आरोपी सापडला आहे. ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवणारे दोन आरोपी जे मुंबईतील बदमाश असल्याचं समोर आलं आहे. त्यांना मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली आहे.
हे वाचा - दुर्दैवी! ढोकळा खाताना ठसका लागला आणि जीव गेला; मुंबईतील डॉक्टर नवरीची वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
इंदौर रेल्वे पोलीसच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितलं की, 18 मे रोजी 19092 गोरखपुर वांद्रे एक्सप्रेसमध्ये अज्ञात व्यक्तीने चैन खेचून बॉम्ब ठेवल्याचं ट्विट आरपीएफ उज्जैनला 11 च्या सुमारास मिळालं. त्यानंतरजीआरपी, आरपीएएफ, सिटी पोलीस, डॉग स्कॉड आणि बीडीडीएस यांनी संयुक्तपणे उज्जैन स्टेशनवर या ट्रेनची तपासणी केली. गाडीत कोणत्याही प्रकारचं स्फोटक सामाना सापडलं नाही. त्यानंतर ही अफवा पसरवणाऱ्याचा तपास सुरू झाला. ज्या अकाऊंटवर हे ट्विट करण्यात आलं त्याचं नाव रजक असल्याचं समोर आलं.
मिलन रजक आणि प्रमोद माळी या दोघांनी मिळून हे कांड केलं. दोघंही मुंबईतील रहिवासी आहेत. एक सांताक्रुझ आणि एक शिवाजी नगरचा राहणारा आहे. दोघांचंही वय अनुक्रमे 44 आणि 24 वर्षे आहे.
आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी केला कांडा
सुरुवातीला हा दहशतवादी कट असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण जेव्हा या दोघांना अटक कऱण्यात आली तेव्हा विचित्र कारण समोर आलं.
हे वाचा - वृद्ध बापानेच झोपेत सून- मुलाचा चिरला गळा; पकडल्यावर म्हणतो, ''साहेब, कारण विचारू नका...''
दोघंही एका प्रायव्हेट कंपनीत कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. गोरखपूर-वांद्रे एक्स्प्रेसमध्ये या दोघांचीही ड्युटी असायची. एका ट्रेनची सफाई झाल्यानंतर त्यांचा कंत्राटदार त्यांना दुसऱ्या ट्रेनच्या सफाईचं काम द्यायचा. त्यामुले ते आपल्या कुटुंबाला कित्येक दिवस भेटू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या डोक्यात बॉम्बची अफवा सोशल मीडियावर पसरवण्याचा विचित्र आला. ट्रेन लेट करण्यासाठी ते रेल्वे आणि पीएमओला ट्वीट करायचे. जोपर्यंत ट्रेनची तपासणी होईल तोपर्यंत दुसरी ट्रेन यायला उशीर होईल आणि त्यांना पुरेसा वेळ मिळेल. यामुळे कोणत्याही ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची बातमी हे आरोपी देत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.