मुंबई, 30 नोव्हेंबर : मुंबई मधील कुर्ला येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिर यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. कुर्ल्यातील पुरातन मंदिरापैकी एक श्री सर्वेश्वर महादेव मंदिर आहे. कुर्ल्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री सर्वेश्वर महादेव मंदिर परिसरात 30 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत ही यात्रा चालणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात चंपाषष्टी पालखी सोहळा रात्री संपन्न झाला. यावेळी कुर्ल्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. चंपाषष्टी ते दत्त जयंती असा दहा दिवस सुरू असणाऱ्या या यात्रेसाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. गेली दोन वर्षे कोरोनमुळे यात्रा मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडत होती. मात्र, यावेळी श्री सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्टने मोठ्या उत्साहात यात्रेचे आयोजन केले आहे.
मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी भरते खंडोबा यात्रा, पाहा काय आहे अख्यायिका video
या दहा दिवसांत मंदिर परिसरात विविध पाळणे, मिठाईची दुकाने, खाण्याची दुकाने, मनोरंजन खेळ, कुस्ती सामने, त्याच बरोबर पारंपरिक नृत्य, भजन अश्या विविध गोष्टीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी सांगितलं. त्याच बरोबर गेल्या अनेक वर्षांपासून कुस्तीचे सामने यात्रेच्या निमित्ताने ठेवले जातात. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत पैलवान भाग घेतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही यात्रा भरविण्यात आली आहे. आणि गेल्या पाच पिढ्यांपासून आम्ही या मंदिरात सेवेसाठी उपस्थित असतो. तर चंपाषष्टी निमित्त महादेवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आलेला असून या यात्रेला सुरुवात झाली आहे, असं मंदिराचे पुजारी सचिन जंगम यांनी सांगितले.
Kolhapur : खंडोबा-म्हाळसा विवाहात ‘या’ हळदीला का असतो विशेष मान? Video
श्री सर्वेश्वर महादेव मंदिर हे 1883 पासून कुर्ल्याचं ग्राम दैवत आहे. यावर्षीचे हे 139 वे वर्ष आहे. मात्र हे मंदिर त्यापेक्षाही अधिक कालावधी पासून याठिकाणी आहे. मात्र चंपाषष्टी म्हंटल तर खंडोबाचा, शंकराचा हा उत्सव आहे. मात्र या पालखीला रामाची पालखी किंवा रामाची यात्रा असं संबोधलं जात, असं भाविक उमेश गायकवाड यांनी सांगितले.