सोलापूर 29 नोव्हेंबर - सोलापुरातील बाळेगावतील श्री क्षेत्र खंडोबा यात्रेस प्रारंभ झाला आहे. ही यात्रा रविवार 18 डिसेंबर पर्यंत चालेल. मार्गशीर्ष महिन्यात दर रविवारी बाळे मंदिरात भक्तांचा महापूर असतो. संध्याकाळी 8 ते 10 या वेळेत छबिना, पालखीसह गावातील मानकरी आणि भक्तगण यात सामील होतात़. अत्यंत सुंदर वाद्यांचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय होते.
काय आहे अख्यायिका?
ऋषीगणांना मणी मल्ल या दोन दैत्यांनी त्रास दिला. त्यामुळे खंडोबाने मल्हारी मार्तंड हा अवतार धारण करुन त्या दोन राक्षसांचा वध करुन सर्वांना संकटमुक्त केले. मार्गशीर्ष षष्ठीच्या रोजी त्यांचा पराभव करून खंडोबारायाचा विजय झाला. त्यावेळी सर्व देवी देवतांनी श्री खंडोबावर चाफ्याच्या फुलाचा वर्षाव केला त्यामुळे हा दिवस चंपाषष्टी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रविवार असल्या कारणाने मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक रविवारी खंडोबाची यात्रा या ठिकाणी भरते, असं मंदिर पुजारी गणेश पुजारी सांगतात.
Kolhapur : देशातील एकमेव मातृलिंग मंदिर, वर्षातून फक्त 3 वेळा उघडतात दरवाजे, Video
गावाचे बाळे हे नाव कसे पडले?
खंडोबा हे कुलदैवत बिदर जिल्ह्यातील आदीमल्हार येथे आहे. परंतु नलराजा आणि दमयंती या राजा राणीच्या भक्ती भावाने अणदूर, उस्मानाबाद येथे प्रस्थान झाले. नंतर गावातील पाटील मंडळांच्या भक्ती भावाने देव बाळरूपात प्रकट झाले त्यामुळे या गावाचे नाव बाळे असे पडले.
गुगल मॅपवरून साभार
सोलापुरातील खंडोबा मंदिर हे शिवकालीन मंदिर
देवाची भक्तीभावाने पूजा करण्यासाठी सर्वच भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येत असतात. सोलापुरातील खंडोबा मंदिर हे शिवकालीन मंदिर आहे. इसवी सन 1650-60 पासून या यात्रेस प्रारंभ झाला आहे.
श्री काळाराम मंदिर नाव कसे पडले? थेट रामायणाशी आहे संबंध, पाहा VIDEO
या यात्रा कालावधीत पहाटे काकड आरती, सकाळी आठ वाजता श्री ची महापूजा आणि महाप्रसादाचे वाटप, दिवसभर जागरण गोंधळ, तळी भंडारी उचलणे ,भंडार खोरे उधळणे, धनगरी ओव्या गाणे, लहान मुलांचे जावळ काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. पालखी मिरवणूक ही मानाचा घोड़ा व नंदीध्वज यांचे सहनंगर तोडण्याचा विधी करून ग्रामप्रदक्षिणा होते. अशाप्रकारे ही यात्रा संपन्न होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.