मुंबई, 21 ऑगस्ट : गोविंदांना (govinda) सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण, त्यांच्या या निर्णयावर टीका होत आहे. पण, हिंदूचे सण जागतिक स्तरावर नेण्याचे काम शिवसेना भाजप युती करत आहे यामुळे पोटशुळ का? असा उलट सवालच शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant ) यांनी विचारला आहे. दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षणामध्ये समावेश करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आज उदय सामंत, आमदार प्रताप सरनाईक आणि दहीहंडी समन्वयक समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. जय जवान संघाने ९ थर लावले होते. त्यामुळ दहीहंडी हा साहसी खेळामध्ये समावेश केलं आहे. आरक्षण २४ तासात लागेल असं बोललं जातंय. यामध्ये MPSC मुलांवर कोणताही अन्याय होणार नाही. गोविंदांना आरक्षण कसे द्यायचे आहे, याबद्दल नियमावली तयार केली जाईल. पुर्वीच्या खेळामध्ये हा प्रकार सहभागी केला जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. (Radhakrishna vikhe patil : काँग्रेसमध्ये हयात घालवलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात आता काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे?) तसंच, हिंदूचे सण आम्ही जागतिक स्तरावर नेण्याचे काम शिवसेना भाजप युती करत आहे. त्यामुळे विरोधकांना यामुळे पोटशुळ उठले का? सरकार बदलले त्यामुळे अनेकांना हे रूचलं नाही म्हणून असे आरोप केले जात आहेत, ऑलम्पिकमध्ये हा खेळ-खेळला जावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असंही सामंत म्हणाले. आज मुख्यमंत्री महोदयांच्या घरावर कॉंग्रेसच्या नेत्यांनी मोर्चा नेला होता.. कांजूरला जाहीर केलेले कारशेड काही बाधा आल्याने आपण आरे मध्येच कारशेड करतो. मेट्रो सुरु झाल्यानंतर सतरा लाख लोक त्यातून प्रवास करतील. मोर्चा नेणाऱ्यांनी काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या गोष्टीचा इगो न करता मुंबईकरांनी शासनाला सहकार्य करावे, असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला. ( रिफायनरी चांगली कशी? गावकऱ्यांनी निलेश राणेंना धरले धारेवर, ताफा अडवला ) विनायक राऊत यांचे म्हणणे आहे की रिफायनरी नको आणि राजन साळवी म्हणत आहे पाहिजे. तुमचं आधी एकमत करा. शिवसंवाद यात्रेला गर्दी होत आहे. पण गर्दी बरोबर दर्दी पण असावी लागते, असं म्हणत सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. तर,या वर्षीचा उत्सवाचा उत्साह वेगळाच होता. अडीच वर्षांनंतर दहीहंडी उत्सव पार पडला. जय जवान गोविंदा पथकात ५५० गोविंदा आहे. हे एकमेव पथक आहे. त्यामुळे नियमावली ठरवली जाईल. नियमावली तयार झाली होती मात्र २०१५ पासून ती अंमलात आली नाही आता शिंदे सरकारने यावर निर्णय घेतला. उद्या १२ वाजता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री यांचे अभिनंदन करणार आहोत. नियमावलीत काही बदल करणार आहोत केंद्राकडून काही तशा सुचना आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार काही बदल केले जातील, असं सरनाईक यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.