जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आदित्य ठाकरेंचं सरकारवर आरोपास्त्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले...

आदित्य ठाकरेंचं सरकारवर आरोपास्त्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले उत्तर, म्हणाले...

या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला आले होते. त्यांना मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. परंतु...

या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला आले होते. त्यांना मोठा प्रतिसाद यावेळी मिळाला. परंतु...

‘दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलची द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या. परंतु नेमकं…’

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : वेदांता-फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रातून गुजरात गेल्याच्या आरोपामुळे राजकीय धुरळा उडाला आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, ‘दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलची द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन वेदांता-फॉक्सकॉन कंपनी गुजरातला गेल्याचा गंभीर आरोप शिंदे सरकारवर केला. आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘दोन वर्षांपूर्वी वेदांता कंपनीला ज्या सवलची द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या होत्या. परंतु नेमकं दोन वर्षांमध्ये त्याचा फॉलोअप घेतला गेला नाही. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करून तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं. (‘वेदांता’ गुजरातला गेल्यानं राजकारण तापलं, आशिष शेलारांनी मांडली शिवसेनेच्या विरोधाची कुंडली) ‘दसरा मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे. दसरा मेळावा परंपरागत होत असल्याने हा मेळावा घेण्याचे ठरले आहे. लवकरच त्याबाबत कुठे होणार आहे ते कळवले जाईल’ असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. ‘आज संघटनात्मक दृष्ट्या पदाधिकारी आमदार खासदार यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शिवसंवाद यात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. आणि सरकारचे काम तळागाळातील आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा काम होणार आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही वेदांता-फॉक्सकॉन कंपनीच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर पलटवार केला. वेदांत प्रोजेक्टच जी मी माहिती घेतलं गेल्या सरकारने पाठपुरावा घेतलं नाही म्हणून प्रकल्प गेली सरकारने बैठक ही घेतली होती पण हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला याच्या चौकशी होणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. काय म्हणाले आदित्य ठाकरे? “वेदांता प्रकल्प राज्यात येणार होता. पण तो प्रकल्प गुजरातला गेला. या प्रकल्पामुळे राज्यातील 1 लाख तरुणांना रोजगार मिळू शकला असता. राज्यातील ही गुंतवणूक नेमकी का निघून गेली ते स्पष्ट करा. वेदांता कंपनीच्या अनिल अग्रवालांशी चर्चा केली होती. फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्राबाहेर गेली. महाराष्ट्रात येणारी कंपनी शेवटच्या मिनिटाला गुजरातला निघून गेली. ती का निघून गेली?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. “राज्यातलं सरकार हे खोके सरकार आहे. जीत के हारने वालो को खोके सरकार कहते है”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात