मुंबई, 30 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वजण नाव घेता मग त्यांच्याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही? असा थेट सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वच राजकीय पक्षांना विचारला. मी हतबल झालो नाही, हातात बांगड्या घातल्या नाहीत, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
खासदार उदयनराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
24 तारखेला पहिली आणि 28 तारखेला दुसरी पत्रकार परिषद घेतली. राजेशाही अबाधित ठेवायचा विचार झाला असता तर ती आज पण अबाधित असती. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, त्यात सर्व धर्मियांना समाविष्ट केले. उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव का घेतात. याचाच अर्थ काय आहे. शिवाजी महाराज यांची कोणत्याही प्रकारे तुलना होऊच शकत नाही.
प्रत्येक पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेतात. सर्वधर्मसमभाव याची व्याख्या आता बदलली आहे का? प्रत्येकजण आपल्या सोयीने याबाबत वागत आहे. ध्रुवीकरणाचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अजेंडा अमलात आणत नसाल तर त्यांचे नाव तरी का घेता? पाकिस्तान वेगळे झाले, बांग्लादेश वेगळे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे प्रांत एकच होते. त्यानंतर देशाचे तीन तुकडे झाले, आता किती होतील माहीत नाही. छत्रपतीच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर होणार काय? प्रत्येक लोकांचा छत्रपतींनी सन्मान केला. प्रत्येक धर्माचा त्यांनी सन्मान राखला. चित्रपटातून वेगळे दाखवले जात आहे. आम्ही आता कोडगे झालो का? सर्व लोकप्रतिनिधी छत्रपतींचे नाव घेता. प्रत्येक चळवळीचे प्रेरणास्थान छत्रपती होते. त्यांचाही अपमान होत आहे. छत्रपतींच्या विरोधात बोलणारे लिखाण करणारे यांच्यावर देशद्रोहनुसार शिक्षा झाली पाहिजे.
लोकांना हे अंगवळणी पडेल. मी हतबल नाही, मी काय बांगड्या घातल्या नाही, वेळप्रसंगी काय करायचे ठरवू. लोकांनी जागे झाले पाहिजे. राज्यपाल आज बोलले, उद्या मोठ्या पदावरील आणखी कोणी करेल. आम्ही खपवून घ्यायचे का? क्षणभर सत्तेत राहायचे म्हणून मी त्याला महत्व देत नाही. प्रत्येक पक्षाने भूमिका स्पष्ट करावी. देशाच्या विभागणीमुळे काय मिळाले? किती जणांना प्राण गमवावे लागले. त्यावेळी का छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारचा विसर पडला. आता आणखी तुकडे पडले तर त्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी याला जबाबदार आहेत. सामान्य लोकांना नेता बोलतो ते खरे वाटते. पण त्याचा परिणाम समाजावर होतो. केवळ हातचे राखून लोकप्रतिनिधी राहत आहेत. लोकांना कोणत्या पक्षाची धोरणे काय हे विचारावे लागते. देश अखंड ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा बेस हवा. असे नाही झाले तर देशाचे अनेक तुकडे पडतील.
जेवढे राज्य तेवढे देश होतील. युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अशी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. देश एकसंघ राहायला हवा इतर देशांनी बघितला तर हेवा वाटायला हवा. हे चालू राहिले म्हणून राज्यपालांचे धाडस झाले. फक्त नावापुरती स्मारके उभा करायची का? 10 नोव्हेंबरला शिवप्रताप दिन होतो. तारीख आणि तिथीचा नवा वाद निर्माण केला जातो. जन्मतारखेच्या बाबतीत अवहेलना होतेय. मला कोणाचे निमंत्रण नव्हते.
आग्र्याहून सुटका त्यांनी केली होती. शिवाजी महाराजांना कोणी पकडून नेले नव्हते. त्यांचा विश्वासघात झाला. माफीनामा अजिबात नाही दिला. याला शूरता म्हणतात. कोणी यांना विरोध करत नाही, त्यामुळे लोढा सारखे बोलतात. अफझलखान कोण संत नव्हता. मी रडत नाही लढत आलोय, आता रडणार नाही तर दाखवणार. मी रडलो नव्हतो इमोशन झालो. 3 तारखेनंतर राज्यपालांच्या विरोधात आंदोलनाची धग वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितले. इतिहास तज्ज्ञाना एकत्र बसवून तारीख ठरवावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.