जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्याचं उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले मला कोणाचाही..

शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्याचं उदयनराजेंनी सांगितलं कारण, म्हणाले मला कोणाचाही..

शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्याचं उदयनराजेंनी सांगितलं कारण

शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्याचं उदयनराजेंनी सांगितलं कारण

शिवप्रतापदिनी गैरहजर राहण्यावर खुद्ध उदयनराजे भोसले यांनी माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 नोव्हेंबर : आज प्रतापगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवप्रताजदिन साजरा करण्यात आला. याला खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहिल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर आता खुद्ध उदयनराजे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वजण नाव घेता मग त्यांच्याबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करणार आहात की नाही? असा थेट सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वच राजकीय पक्षांना विचारला. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ..त्यामुळे शिवप्रतापदिनी गैरहजर आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याच्या निमित्ताने शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. मात्र, याला साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले गैरहजर राहिल्याचे बोलले जात होते. यावर बोलताना मला आमंत्रण नव्हते. फोन देखील आला नसल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी शिवप्रताप दिनाची तारीख एकच केली पाहिजे. हा वाद मिटवायला हवा. इतकी वर्षे 10 नोव्हेंबर हा दिवस होता. आजचा कार्यक्रम राजकारण होते की नाही यावर बोलणार नाही, असंही उदयनराजे म्हणाले. वाचा - ..तर महाराजांचं नाव घेऊ नका, उदयनराजेंचा भाजपसकट सर्व पक्षांना गंभीर इशारा, म्हणाले.. खासदार उदयनराजे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे प्रत्येक पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेतात. सर्वधर्मसमभाव याची व्याख्या आता बदलली आहे का? प्रत्येकजण आपल्या सोयीने याबाबत वागत आहे. ध्रुवीकरणाचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अजेंडा अमलात आणत नसाल तर त्यांचे नाव तरी का घेता? पाकिस्तान वेगळे झाले, बांग्लादेश वेगळे झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे प्रांत एकच होते. त्यानंतर देशाचे तीन तुकडे झाले, आता किती होतील माहीत नाही. छत्रपतीच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर होणार काय? प्रत्येक लोकांचा छत्रपतींनी सन्मान केला. प्रत्येक धर्माचा त्यांनी सन्मान राखला. चित्रपटातून वेगळे दाखवले जात आहे. आम्ही आता कोडगे झालो का? सर्व लोकप्रतिनिधी छत्रपतींचे नाव घेता. प्रत्येक चळवळीचे प्रेरणास्थान छत्रपती होते. त्यांचाही अपमान होत आहे. छत्रपतींच्या विरोधात बोलणारे लिखाण करणारे यांच्यावर देशद्रोहनुसार शिक्षा झाली पाहिजे. लोकांना हे अंगवळणी पडेल. मी हतबल नाही, मी काय बांगड्या घातल्या नाही, वेळप्रसंगी काय करायचे ठरवू. लोकांनी जागे झाले पाहिजे. राज्यपाल आज बोलले, उद्या मोठ्या पदावरील आणखी कोणी करेल. आम्ही खपवून घ्यायचे का? क्षणभर सत्तेत राहायचे म्हणून मी त्याला महत्व देत नाही. प्रत्येक पक्षाने भूमिका स्पष्ट करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात