मुंबई, 08 सप्टेंबर : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांचा मुलगा अमित भोसले (amit bhosle) यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र विशेष न्यायालयानं अमित भोसले यांच्यासह सहआरोपी रणजित मोहिते यांना देखील जामीन दिला आहे. अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले आणि रणजित मोहिते यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरण अटक करण्यात आली होती. बुधवारी न्यायालयात हजर केले असताना दोघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्या विरोधातील दोषारोपपत्राची दखल घेतली. मूळ गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त किंवा निर्दोष सुटले असतील, तर त्या गुन्ह्याच्याआधारे दाखल करण्यात आलेला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा टिकणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिला होता. त्याचाच आधार घेऊन अमित भोसले आणि मोहिते या दोघांनी विशेष न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती. काय आहे प्रकरण दरम्यान, पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मे महिन्यात CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे. कोण आहे अविनाश भोसले? अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे (ABIL Group) मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.