गणेश गायकवाड, (ठाणे) 25 नोव्हेंबर : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकल्याच्या घशात मासा अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय. शहाबाज अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे. घरात खाण्यासाठी मासे आणले होते. त्याच ठिकाणी खेळत असणाऱ्या चिमुकल्याच्या तोंडात मासा गेल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधील उलन चाळ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या सहा महिन्याच्या चिमुकल्याच्या घशात मासा अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय. शहाबाज अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे.
हे ही वाचा : भावासोबत झालेल्या भांडणाचा राग चिमुकल्यावर काढला; नाशिकच्या आश्रमशाळेतील हत्येचं गूढ उकललं
गुरुवारी संध्याकाळच्या सुमार शहाबाज हा घरात ऐकटाच खेळत होता, त्याच वेळेस शहाबाजच्या आईने घरांमध्ये खाण्यासाठी छोटया आकाराचे मासे आणले होते. हे जिवंत मासे एका बाजूला घरामध्ये जमिनीवर ठेवले होते. मात्र आईची नजर चुकवत शहाबाज हा रांगत रांगत त्या मासे ठेववेल्या ठिकाणी पोहोचला. त्याने एक जिवंत मासा तोंडात घातला, मात्र हा मासा शहाबाजच्या घशात जाऊन अडकला, त्यामुळे शहाबाज अस्वस्थ झाला.
त्यानंतर शहाबाजच्या आईने आणि आजूबाजूच्या रहिवाशांनी शहाबाजला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. डॉक्टरांनी शहाबाजची तपासणी केली असता त्याच्या घशात एक मासा अडकल्याचे आढळून आले दरम्यान शर्थीचे प्रयत्न करत डॉक्टरांनी त्याच्या घशातील मासा बाहेर काढला परंतु त्याचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा : वधुवर सूचक मेळाव्याखाली कोल्हापुरात वेश्या व्यवसाय, पोलीस स्टेशनजवळच प्रकार
शवविच्छेदनानंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.