मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मिस्त्री आणि TATA यांचा वाद काय होता? कोण जिकलं खटला? नंतर रतन टाटांनी केला मोठा बदल

मिस्त्री आणि TATA यांचा वाद काय होता? कोण जिकलं खटला? नंतर रतन टाटांनी केला मोठा बदल

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला.

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचे रविवारी मुंबईतील पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. टाटा समूह (Tata Group) आणि सायरस मिस्त्री यांच्यातील वाद हा भारतीय कॉर्पोरेट जगतात सर्वाधिक चर्चेत असलेला वाद होता. आगामी काळात सायरस मिस्त्रीसारखी वादाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी टाटा समूहाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. अलीकडेच, टाटा सन्सने कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांची मंजुरीही घेतली. आता टाटा सन्स आणि टाटा ट्रस्टच्या अध्यक्षांची पदे वेगळी झाली आहेत. नव्या नियमानुसार या पदांवर कोणत्याही एका व्यक्तीची नियुक्ती करता येणार नाही.

काय केला बदल?

टाटा समूहाच्या एजीएममध्ये आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील बदलाला मंजुरी देण्यात आली. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी सर्व संचालकांची संमती असणे गरजेचं आहे. यासोबतच अध्यक्ष आणि संचालक पदांवर नियुक्त्या सुचवण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.

काय होता मिस्त्री-टाटा वाद

2006 मध्ये, पालोनजी मिस्त्री टाटा समूहाच्या संचालक मंडळातून निवृत्त झाले आणि त्यांची जागा 38 वर्षीय सायरस मिस्त्री यांनी घेतली. पालोनजी मिस्त्री हे टाटा समूहाचे सर्वात मोठे शेअरहोल्डर होते. अशाप्रकारे शापूरजी पालोनजी समूहाव्यतिरिक्त टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांचे संचालक म्हणून सायरस यांची निवड झाली. नोव्हेंबर 2011 मध्ये सायरस मिस्त्री यांना टाटा समूहाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले. आणि रतन टाटा यांच्या निवृत्तीनंतर त्यांना 28 डिसेंबर 2012 रोजी टाटांचे अध्यक्ष बनवण्यात आले.

सायरस मिस्त्री कोर्टात रतन टाटा यांच्याकडून हरले

सायरस मिस्त्री यांनी समूहाचे सहावे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. परंतु, 2016 मध्ये मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यांना अचानक काढून टाकल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्स आणि रतन टाटा यांच्याविरोधात खटला दाखल केला. सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निकाल लागला. यानंतर टाटा समूहाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने टाटा समूहाच्या बाजूने निकाल दिला. याला सर्वात मोठी कॉर्पोरेट लढाई म्हणतात. टाटा सन्सची टाटा समूहात 66 टक्के भागीदारी आहे. यानंतर शापूरजींची सर्वाधिक 18.37 टक्के भागीदारी होती.

वाचा - Video : चेंदा-मेंदा झालेली कार, रस्त्यावर सायरस मिस्त्रींचा मृतदेह; पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य

कोण होते सायरस मिस्त्री?

सायरस मिस्त्री हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला. 1992 मध्ये सायरस मिस्त्री यांनी भारतातील आघाडीच्या वकीलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे आहेत. सायरस मिस्त्री यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि एंड जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर ते सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी लंडनला गेले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून (व्यवस्थापन) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याच्याकडेही वडिलांप्रमाणे आयरिश नागरिकत्व आहे.

1991 मध्ये वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले

सायरस मिस्त्री यांनी 1991 मध्ये त्यांच्या वडिलांच्या व्यवसाय पालोनजी शापूरजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या वडिलांप्रमाणे, सायरस मिस्त्री यांनी भारतात अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले, ज्यात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

सायरस यांनी व्यवसायाला नव्या उंचीवर नेलं

सायरस मिस्त्री यांनी त्यांच्या दोन दशकांच्या कार्यकाळात बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेटच्या बाबतीत जगभरात शापूरजी पालोनजी अँड कंपनीची स्थापित केलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी मध्य पूर्व आणि आफ्रिकेत वाढली आहे. या समूहाचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. वडिलांच्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेण्याचे श्रेय त्यांना जाते. सायरस मिस्त्री हे कन्स्ट्रक्शन फेडरेशन ऑफ इंडियाचे संस्थापक सदस्य देखील आहेत.

First published:
top videos

    Tags: Ratan tata, Tata group