मुंबई 21 जुलै : मुंबईत सततच्या मुसळधार पावसामुळे मोसमी आजारांच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. अशातच शहरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे (Swine Flu Cases in Mumbai). विशेष म्हणजे, शहरात इन्फ्लूएंझा H1N1 ची लागण झालेले किमान चार रुग्ण लाइफ सपोर्टवर आहेत. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की शहरात पुन्हा व्हायरल संसर्ग पसरत आहे, ज्या लोकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येत आहे त्यांनी H1N1 चाचणी करावी.
नागरी संस्थेने मंगळवारी सांगितलं की जुलैमध्ये इन्फ्लूएंझा H1N1 ची 11 पुष्टी झालेली प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर जूनमध्ये दोन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्यांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान दोन ते तीन केसेस येत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. COVID-19 प्रमाणे, H1N1 हा एक श्वसन रोग आहे.
Hypertension : हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी कशी करेल मदत?
गेल्या आठवड्यात राज्यात H1N1 मुळे पहिल्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 10 जुलै रोजी पालघरच्या तलासरी येथील 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. शहरात गेल्या तीन वर्षांत H1N1 ची कोणतीही पुष्टी झालेली नाही.
TOI च्या अहवालानुसार, स्वाइन फ्लूवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, जसं की Oseltamivir. डॉ वसंत नागवेकर, एक संसर्गजन्य रोग विशेषज्ञ आहेत. त्यांनी गेल्या काही आठवड्यात अनेक रुग्णांवर उपचार केले आहेत, त्यांनी सांगितलं की , “हे औषध चांगलं कार्य करतं, यामुळे आजार जास्त गंभीर होण्यापासून रोखला जाऊ शकतो."
"बहुतेक प्रकरणांमध्ये ताप, नाक वाहणे, अंगदुखी, वरच्या श्वसनमार्गाचे संक्रमण ही लक्षणं दिसून येतात, असंही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की H1N1 साठी डॉक्टरांकडे संशयाचे उच्च निर्देशांक असणे आवश्यक आहे. नागवेकर म्हणाले की, गंभीर लक्षणे असलेल्यांनी आपल्याला कोरोना आहे, असं समजून जास्त काळ वाट पाहत बसू नये. ही लक्षणे असताना कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यास. स्वाईन फ्लूची टेस्ट करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे."
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai News, Swine flu in india