मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : शेवटच्या प्रवासातील आधार! अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडणारे 'सुखांत'

Video : शेवटच्या प्रवासातील आधार! अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडणारे 'सुखांत'

X
आजच्या

आजच्या डिजिटल युगात नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कंपन्या सुरु झाल्या आहेत.अंत्यसंस्काराची सुविधा देणारी सुद्धा कंपनी आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

आजच्या डिजिटल युगात नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कंपन्या सुरु झाल्या आहेत.अंत्यसंस्काराची सुविधा देणारी सुद्धा कंपनी आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 नोव्हेंबर : आजच्या डिजिटल युगात नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कंपन्या सुरु झाल्या आहेत. याच्या माध्यमातून आपण घरबसल्या सुविधा सुद्धा उपभोगतो. पण अंत्यसंस्काराची सुविधा देणारी सुद्धा कंपनी आहे हे माहितीये का तुम्हाला? मुंबईतील संजय रामगुडे यांनी सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरु केलेली आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणार साहित्य ही कंपनी पुरवते.

काय काम करते सुखांत अंतिम संस्कार ही कंपनी?

प्रत्येकाचा जन्म आहे म्हणजे मृत्यू पण आहेच. प्रत्येकजण आत्मसन्मानाने जगतो. मात्र, मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार सुद्धा व्यवस्थित विधिवत पार पडावे यासाठी कुटुंबाचे प्रयत्न असतात. मात्र, बऱ्याच वेळा विविध अडचणींना सामोरे जावे लागते आणि याच अडचणी दूर करण्यासाठी सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु झाली. मृत्यूचा फोन आल्यावर ही कंपनी ज्याच्या त्याच्या धर्म व रीती प्रमाणे लागणारी साधनसामग्री, पंडित, ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून देते तसंच थेट अंत्यविधी होईपर्यंत कंपनीचे लोकं तेथेच असतात. त्यामुळे कुटुंबियांना मोठा आधार मिळतो.

Mumbai : गाणी, सिनेमा रेकॉर्ड प्लेयवर ऐकायला आवडणाऱ्यांसाठी 'इथं' आहे खजिना, पाहा Video

ज्या ज्येष्ठाचे कुटुंबीय लांब राहतात त्यांना सुद्धा सुखांतकडून सुविधा

आजच्या युगात अनेक मुलं कामानिमित्त आपल्या आई वडिलांपासून लांब राहतात. त्यामुळे या कपंनीच्या सभासद असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्यापासून ते मृत्युनंतर त्यांचा मृत्यूचा दाखला कुटुंबियांच्या हातात सोपवण्याचे काम सुखांत अंतिम संस्कार कंपनी करते.

गेल्या 8 वर्षांपासून सुखांत अंतिम संस्कार कंपनी मुंबईत कार्य करत आहे. आजपर्यंत 5000 पेक्षा जास्त अंत्यविधी केले असून या कंपनीच्या माध्यमातून 20-25 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अंत्यसंस्कारातून रोजगार उपलब्ध करून देणारीही एकमेव कंपनी आहे.

सुखांतला किती पैसे द्यावे लागतात?

खरं तर सुखांतच्या माध्यमातून आम्ही लोकांना आधार मिळावा यासाठी एक वेगळी सेवा पुरवत आहोत. 8 हजार ते 9 हजार अंत्यसंस्कार विधिसाठी आम्ही घेतो. तसेच ज्या ज्येष्ठना सभासदत्व घ्यायचे असल्यास त्याची किंमत 30 ते 35 हजार इतकी आहे. बरेच लोकं ओळखत असल्यामुळे आम्हालाच अंत्यविधीसाठी बोलावतात तसेच अंत्यविधीचे पैसे सुद्धा सामान्यांना परवडेल असेच आहेत. आम्ही ही सेवा मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात पुरवतो, असं सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिटेडचे मालक संजय रामगुडे यांनी सांगितले.

Video : भंगारपासून नवं विश्व बनवणारा अफलातून मुंबईकर, डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

अधिक माहिती साठी वेबसाईट लिंक 

https://sukhantfuneral.com/

First published:

Tags: Local18, Mumbai