मुंबई, 19 नोव्हेंबर : जुनी गाणी सदाबहार आहेत, ती ऐकल्यावर मन आमच्या जमान्यात जातं, जुन्या गाण्यांना अर्थ होता, प्रेमाचा रंग होता, असं आपण वडिलधाऱ्या मंडळींकडून नेहमी ऐकतो. आपणही ती गाणी ऐकताना वेगळ्याच विश्वात हरवतो. ही गाणी ऐकण्यासाठी वेगवेगळे गॅझेट्स आणि अॅप आज उपलब्ध आहेत. त्यामध्ये रोज नव्या साधनांची भर पडतीय. काळ वेगानं बदलत असला तरी आजही गाणी, सिनेमा कॅसेट्स आणि रेकॉर्डरवर ऐकायला अनेकांना आवडतं. या रसिकांसाठी
मुंबई
तील एका दुकानाचा पत्ता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सीडी, व्हीसीडी आल्यानंतर कॅसेट्सचं महत्त्व कमी झाला. आता सीडी, व्हिसीडीची जागा ही पेन ड्राईव्हनं घेतलीय. एखाद्या चित्रपटाची गाण्यांची ऑडिओ कॅसेट, किंवा रेकॉर्डवर तो चित्रपट मिळणे हे आता अवघड बनलं आहे. पण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात असलेल्या एका दुकानात आजही अनेक जुन्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मिळतात. जुन्या चित्रपटांचा खजिना मुंबईतील अब्दुल रझाक सीएसएमटी स्टेशनच्या परिसरात 70 च्या दशकापासून हे छोटंसं दुकान चालवतात. मित्राकडे असलेल्या 50 रेकॉर्ड्स पासून त्यांनी विक्रीसाठी सुरुवात केली. या रेकॉर्ड्स ना उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांनी हा व्यवसाय सूरु केला.
दुर्मिळ पुस्तकांचा खजिना असलेलं ठिकाण, मुंबईकरांचा शोध इथं संपतो!
15000 पेक्षा जास्त कॅसेट्स आणि सीडी अब्दुल यांच्या दुकानात हव्या असलेल्या सिनेमाचे रेकॉर्ड मिळते असा अनेक ग्राहकांचा समज आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांच्या कॅसेट्स आणि सीडी त्यांच्याकडे आहेत. मुघल ए आझम, जोधा- अकबर या सिनेमाचे रेकॉर्ड्स हे दुर्मिळ आहेत. ते देखील या दुकानात उपलब्ध आहेत. 15000 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स त्यांच्याकडे मिळतात. हॉलिवूड तसंच बॉलिवूडमधल्या नव्या सिनेमाचे ओरिजिनल रेकॉर्ड्स सुद्धा इथं विकले जातात.
गुगल मॅपवरून साभार
काय आहे किंमत? या दुकानात मिळणाऱ्या रेकॉर्ड्सची किंमत 400 ते 5000 इतकी आहे. दुर्मिळ रेकॉर्ड्स असले की त्याची किंमत महाग असते. . छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सपासून 5 मिनिटांच्या अंतरावर हे दुकान आहे. पक्ष्यांच्या पंखावर चित्र काढणारा एकमेव भारतीय कलाकार, पाहा Video ‘मी 50 रेकॉर्ड्स विक्रीपासून सुरुवात केली होती. तेव्हा मी सतत रेकॉर्ड्स च्या शोधात असायचो आता जुने रेकॉर्ड्स मिळतात आणि पटकन विकले पण जातात. अजूनही रेकॉर्ड्स ऐकणारे लोकं आहेत. युट्यूबचा प्लॅटफॉर्म उपलब्ध असून सुद्धा लोकं रेकॉर्ड्स ऐकायला नेतात,’ असं अब्दुल रझाक यांनी सांगितलं. संपर्कासाठी क्रमांक : 98209 33365