मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कर्नाटकचे CM काही शांत बसेना, आता म्हणे, 'सोलापूर, अक्कलकोट आमचंच!'

कर्नाटकचे CM काही शांत बसेना, आता म्हणे, 'सोलापूर, अक्कलकोट आमचंच!'

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवं विधान केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवं विधान केलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवं विधान केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 नोव्हेंबर : सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा सांगितल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील भूभागांवर नवा दावा केली आहे. 'सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचा वक्तव्य बोम्मई यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीबद्दल नवं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी हे वक्तव्य केले आहे. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकाचे असावेत. 'महाराष्ट्रातील कन्नड भाषिक भाग कर्नाटकचा आहे', अशी आमची मागणी आहे, असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.

('शिवसेनेकडून धमकी देतोय...', संजय राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भरला दम)

दोनच दिवसांपूर्वी, पाण्याच्या मुद्यावरून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकात सामील व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठं विधान केलं आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

आता कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घ्या. या सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असावं, असं फडणवीस म्हणाले.

('एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील'; गुलाबराव पाटलांकडून पाठराखण)

'सांगली जिल्ह्यातील जतमधील या गावांनी 2012 मध्ये ठराव केला होता. आता कोणीही ठराव केलेला नाही. आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून त्यांनी तेव्हा असा ठराव केला होता. मी मुख्यमंत्री असताना कर्नाटक सरकारसोबत बोलणी केली होती आणि जिथे पाणी उपलब्ध आहे. तिथून पाणी देण्याचा आपण निर्णय केला होता' असा खुलासाही त्यांनी केला.

एकही गाव महाराष्ट्राचा कुठे जाणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणी सह जे आमचे गाव आहेत ते आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं.

First published:

Tags: Marathi news