जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील'; गुलाबराव पाटलांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण

'एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील'; गुलाबराव पाटलांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण

'एकनाथ शिंदेच ज्योतिषाचं भविष्य सांगतील'; गुलाबराव पाटलांनी केली मुख्यमंत्र्यांची पाठराखण

या प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील

  • -MIN READ Nandurbar,Maharashtra
  • Last Updated :

निलेश पवार, नंदुरबार 24 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर असताना ज्योतिष पाहायला गेले होते. त्यामुळे वाद पेटला आहे. यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली आहे. आता या प्रकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे, असं ते म्हणाले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले’, सुप्रिया सुळे म्हणाल्या… या प्रकरणावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वतःचं भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा दावा पाटील यांनी केला. मुख्यमंत्री स्वतःचं भविष्य बघणार नाही, तर तेच भविष्यकाराचं भविष्य सांगतील. असा आमचा नेता आहे, असं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितले तर नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, अशी प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव यांनी दिली आहे. शिंदे सरकार देणार वीजेचा झटका, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते, त्या दरम्यान ते ज्योतिष पाहायला गेले असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंनिसनेही आक्षेप घेतला आहे. गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही सडकून टीका केली. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची गरज भासली नसती, असा टोला पाटील यांनी लगावला. तर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यासंदर्भात केलेल्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की ग्रामपंचायतीचा एक वार्डसुद्धा कर्नाटकमध्ये जाऊ देणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात