मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मग 2 वर्षे फक्त खोक्यांची ओझी वाहत होता? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल

मग 2 वर्षे फक्त खोक्यांची ओझी वाहत होता? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल


'मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल,

'मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल,

'वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 15 सप्टेंबर : वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. शिंदे गटाच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीने महाराष्ट्राशी उभा दावा मांडला आहे. शिंदे मात्र सर्व खापर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर फोडून स्वतःचे अपयश झाकत आहेत. शिंदे यांचे नाव बदलून यापुढे श्रीमान खापरफोडे असेच ठेवायला हवे, अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.

वेदांता – ‘फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.

'वेदांता-फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. याआधी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले. काय तर म्हणे, या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त खोक्यांची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? असा टोला शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना लगावला.

(मैदान 'शिंदें'चं पण हवं उद्धवना, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लान बी!)

'फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचा देखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे. ‘आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या’, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील, अशी टीकाही सेनेनं केली.

(महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का गेला? वेदांताच्या अध्यक्षांनी सांगितली Inside Story)

'वेदांता – ‘फॉक्सकॉन’ची लूट शिवसेनेने उघड केली नसती तर हा घास पचवून त्यांनी आणखी काही गिळले असते. त्यांना ‘फॉक्सकॉन’प्रमाणे मुंबई-ठाणे जिंकायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातला शेती उद्योग खतम करायचा आहे. त्यांना महाराष्ट्राचे वैभव, लौकिक नष्ट करून महाराष्ट्राला दिल्लीच्या वाटेवरचे पायपुसणे करायचे आहे, अशी टीकाही सेनेनं केली.

First published: