मुंबई, 10 सप्टेंबर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुलाखतीदरम्यान आपली भूमिका मांडली. CNN News18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी सध्याच्या राज्यातील सरकारवर त्यांनी निशाणा साधला. मुंबईतील हिंदमाता या ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचलं नाही. आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं. असं म्हणताना त्यांनी सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. शिवसेनेतील 40 जणांच्या बंडखोरीबद्दल ते म्हणाले की, सर्वांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. यानंतर जनता जो काही निर्णय देईल, तो आम्ही स्वीकार करू.
"This was a time (when Uddhav Thackeray was ailing) when 40 gaddars were conspiring against my father. I've never seen a betrayal of this low level ever before": @AUThackeray
— News18 (@CNNnews18) September 10, 2022
Watch #CNNNews18Townhall LIVE now: https://t.co/z13U3QjoD8 | @Zakka_Jacob @vinivdvc #Maharashtra pic.twitter.com/Nuv4Qy0oDH
जनतेला नेमकं काय घडलं हे माहिती आहे. त्यामुळे ते आमच्या पाठिशी उभं राहतील, यावर माझा विश्वास आहे. मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित उद्धव ठाकरे यांच्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना भेटण्यासाठी तीन वेळा RTPCR टेस्ट घ्यावी लागत होती. त्या काळात 40 आमदार शिवसेना फोडण्याची प्लानिंग करीत होते.
#LIVE | Informed conversations, nuanced opinions on one dynamic platform! Catch Mumbai's biggest newsmakers @Dev_Fadnavis, @AUThackeray and @TheAaryanKartik live on #CNNNews18Townhall https://t.co/bYT66dWAiM
— News18 (@CNNnews18) September 10, 2022
तो काळ कुटुंबासाठी कठीण होता, असं म्हणत आदित्यनीं तो भयंकर दिवस आठवला. याशिवाय त्यांना शिवसेना चिन्ह गमावण्याबद्दल विचारण्यात आलं. यावर आदित्य म्हणाले की, 40 खंजीर पाठीत खुपसल्यानंतर आणखी कसली भीती राहिलेली नाही.