मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित

मुंबईला शांघाय बनवणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराने सारेच अचंबित

काय म्हणाले उपमुख्यमंत्री...

काय म्हणाले उपमुख्यमंत्री...

काय म्हणाले उपमुख्यमंत्री...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या अनोख्या शैलीत CNN News18 येथे संवाद साधत आहेत. नेटवर्क18 च्या TOWN HALL या विशेष कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची मुलाखत घेण्यात येत आहे. या सत्राची पहिली मुलाखत देवेंद्र फडणवीस यांची घेण्यात येत आहे.

गेल्या अडीच वर्षात सरकारने काय केलं, हे कोणालाच माहिती नाही. कोरोना काळात सरकारने फक्त फेसबुक लाइव्ह केलं. मी त्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळी मी तीन वेळा महाराष्ट्रभरात फिरलो. अनेक रुग्णालयांमध्ये गेलो, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

मुंबईला शांघाय बनवणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले की, मुंबईला शांघाय का करायचं आहे? मुंबई मुंबई आणि मुंबईला शांघायपेक्षा अधिक चांगलं करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.

शिवसेना तोडण्यास कोण जबाबदार? 

शिवसेना तोडण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: जबाबदार आहे. त्यांनी भाजपसोबतची युती तोडून वेगळी आघाडी स्थापित केली. आणि स्वत:च्या पक्षात त्यांच्याविषयी नाराजगी होती. त्यामुळे शिवसेना तोडण्यासाठी आम्ही नाही तर उद्धव ठाकरे स्वत: जबाबदार आहेत, असं म्हणत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Mumbai