जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Vijay Wadettiwar : शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू, 50 वर्षे शिवसेनेनं मुंबईला सुरक्षित ठेवलं : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू, 50 वर्षे शिवसेनेनं मुंबईला सुरक्षित ठेवलं : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू, 50 वर्षे शिवसेनेनं मुंबईला सुरक्षित ठेवलं : विजय वडेट्टीवार

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोंबर : शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. यावर काल शिवसेनेसह राज्यातील विविध पक्षानी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी काँग्रेंसच्या नेत्यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते म्हणाले कि मुंबईला मागच्या 50 वर्षांत शिवेसेनेने मुंबईला सुरक्षित ठेवलं आहे.

जाहिरात

ते पुढे म्हणाले कि, स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टाने उभ्या केलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्याचा निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे लाखों शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. 50 वर्ष  शिवसेनेने मुंबईला सुरक्षित ठेवले. राज्यातील लाखो शिवसैनिकांच्या भावना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासोबत  जोडलेल्या आहे.

हे ही वाचा :  शरद पवार आणि भाजपचा मोठा नेत्याचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण

त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे या लाखों शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले आहे. पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. मी सुद्धा शिवसेनेत काम केले आहे, सामान्य शिवसैनिकांचा पक्षासाठी संघर्ष आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्यासाठी त्यांची धडपड मी जवळून पाहिली आहे.

जाहिरात

धनुष्यबाण’ न मिळाल्यामुळे गुलाबराव पाटील दुखावले

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने आधी सर्वोच्च न्यायालयात आणि नंतर निवडणूक आयोगात धाव घेतली. धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने जोरदार फिल्डिंग लावली. पण, निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. धनुष्यबाण गोठवल्यामुळे शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील कमालीचे दुखावले आहे.

हे ही वाचा :  ना बंड, ना उठाव, तरीही मनसेवर आली होती ‘इंजिन’ गमवण्याची वेळ!

जाहिरात

दोन्हीही गटाची धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी होती मात्र चिन्ह नाही मिळालं याचं आम्हाला दुःख असल्याचे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवास स्थानावरती बैठक बोलावली आहे. या बैठकीत नवीन चिन्ह निश्चित होण्याची शक्यता मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्तवली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात