जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ना बंड, ना उठाव, तरीही मनसेवर आली होती 'इंजिन' गमवण्याची वेळ!

ना बंड, ना उठाव, तरीही मनसेवर आली होती 'इंजिन' गमवण्याची वेळ!

त्यावेळी मनसेच्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला,

त्यावेळी मनसेच्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला,

त्यावेळी मनसेच्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला,

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे शिवसेनेवर मोठी नामुष्की ओढावली आहे. पण, राज ठाकरे यांच्या मनसेवर सुद्धा पक्षचिन्ह गमवण्याची वेळ आली होती. त्यावेळी मनसेमध्ये ना बंडखोरी झाली ना, उठाव फक्त मनसेचा सुपडा साफ झाल्यामुळे इंजिन धोक्यात आले होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी मनसे पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीमध्ये मनसेला इंजिन हे चिन्ह मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत मनसेनं दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे मनसेला चिन्ह देण्यात आले होते. पहिल्याच निवडणुकीत मराठी माणसाच्या मु्द्यावर राज ठाकरे यांच्या मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2012 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून आले होते. नाशिकमध्ये महापालिका सुद्धा ताब्यात आली होती. पण, 2014 च्या निवडणुकीत मनसेला मोठा हादरा बसला. मनसेचे सर्व आमदार पराभूत झाले. जुन्नरमधून एकच आमदार निवडून आला होता. 13 आमदारांवरून एकच आमदार निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली मान्यता धोक्यात आली होती. विधानसभेतल्या सुमार कामगिरीमुळे मनसेच्या प्रादेशिक मान्यतेबरोबरच पक्षाचं चिन्ह वाचवण्यासाठी राज ठाकरेंना झगडावं लागलं होतं. (‘हम बेवफा हरगीज ना थे, पर..’; सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या, ‘मला शिंदे गटाची काळजी वाटते’) त्यावेळी मनसेच्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर अशा दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर हक्काचा नाशिकचा बालेकिल्लाही खराब कामगिरीमुळे कोसळला. जुन्नरला शरद सोनावणेंच्या रूपानं एक आमदार निवडून आला होता. पण, तोही पक्षात टिकतो की नाही अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे मनसेचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी दोन आमदार किंवा सहा टक्के मते किंवा विधानसभेच्या एकूण जागांपैकी 3 टक्के जागा निवडून आणणं किंवा किमान तीन आमदार निवडून आणणं असे 3 निकष गरजेचे असतात. मात्र मनसे यापैकी कुठल्याच निकषांमध्ये बसत नसल्याने मनसेची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द होण्याची तसंच निवडणूक चिन्हही जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. ( Shivsena VS Shinde : शिवसेनेसमोर या 3 चिन्हाचे पर्याय, उद्याच निवडणूक आयोगाकडे करणार दावा? ) पण, मनसेनं निवडणूक आयोगात धाव घेतली आणि डावीकडून उजवीकडे धावणाऱ्या इंजिनची दिशा बदलून घेतली. मनसेला जेव्हा चिन्ह मिळाले होते, तेव्हा ते उजवीकडून डावीकडे धावत होते. पण, 2012 मध्ये याची दिशा बदलली होती. ती नंतर मनसेनं पत्र लिहून निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळवून घेतली आणि दिशाही बदलली. मधल्या काळात मनसेनं आपला झेंडा सुद्धा बदलला. शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंडा वापरला जात आहे. पण, राजमुद्रा वापरण्यावरून टीका झाल्यामुळे झाल्यामुळे दोन्ही झेंडे वापरले जाणार अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात