मुंबई, 26 जुलै : सोशल मीडियावर उद्योजक ललित मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेनचे (Lalit Modi and Sushmita Sen) फोटो व्हायरल झाले होते तेव्हा एकच खळबळ पहायला मिळाली. जिकडे तिकडे त्यांचीच चर्चा पहायला मिळत होती. सुष्मिता आणि ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याचं समजल्यावर तर अनेकांना धक्काच बसला. तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत असलेले पहायला मिळतात. त्यांनी कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला तरी तो सध्या व्हायरल होत असलेला पहायला मिळतोय. अशातच दोघांच्या अफेअरच्या बातमीवर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या पहायला मिळाल्या. अनेकांनी त्यांना जोरदार ट्रोल केलेलं पहायला मिळालं. या सगळ्या ट्रोलिंगवर ललित मोदींनी आता मौन सोडलं आहे.
ट्रोलिंग करणाऱ्यांसाठी ललित मोदींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ललित मोदींनी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे. ज्यामध्ये चार वेगवेगळ्या बातम्या दाखवल्या आहेत. या चार बातम्यांपैकी एक बातमी ललित आणि सुष्मिताच्या नात्याचीही आहे. देशाच्या मोठ्या समस्यांकडे लोक कसे दुर्लक्ष करतात हे व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे, मात्र प्रत्येकालाच त्यांच्या नात्याच्या बातम्यांमध्ये अधिक रस आहे. ट्रोलर्सला उत्तर देण्याचा हा हटके अंदाज अनेकांना चांगलाच आवडला आहे.
ललित मोदींनी या पोस्टला एक भन्नाट कॅप्शनही दिलेलं पहायला मिळालं. 'मी वाद निर्माण करतो, मात्र अशाप्रकारे', असं म्हणत ललित मोदींनी ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेटं येत आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून अनेकांचं लक्ष वेधत आहे.
View this post on Instagram
14 जुलै रोजी ललित मोदी यांनी ट्विटरवर एका पोस्टद्वारे सुष्मिता सेनसोबतचे नाते जाहीर केले होते. एका ट्विटमध्ये त्यांनी अभिनेत्रीला आपलं बेटर हाफ म्हटलं होतं. त्यामुळे अनेकांना त्यांनी लग्न केलं असंच वाटलं. त्यामुळे दोघांचंही लग्न झाल्याच्या बातम्या वाऱ्यासाख्या सगळीकडे व्हायरल झाल्या. मात्र, नंतर दुसऱ्या एका पोस्टमध्ये मोदींनी हे दोघे सध्या एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार असल्याचे स्पष्ट केले. ललित मोदींनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये सुष्मिता सेनच्या हातात अगंठी दिसत होती. या बातमीनं अनेकांना हैराण केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Instagram post, Social media, Sushmita sen wedding