जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

मुंबईत पदाधिकारी फोडण्याचा शिंदे गटाकडून प्रयत्न, मनसे नेत्याचा गंभीर आरोप

भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे.

भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे.

भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे, भाजप आणि शिंदे गटामध्ये युतीची चर्चा रंगली आहे. पण, आता शिंदे गटाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपसोबत हातमिळवणीची चर्चा सुरू आहे. शिंदे गटासोबतही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. पण, आता मनसेचे सरचिटणीस संजय नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू आहे. विविध प्रकारची अमिष आणि पदांची लालूच दाखवली जात आहे. मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका केल्या जात आहेत, असा आरोपच मनसे सरचिटणीस संजय नाईक यांनी केला आहे. (संघावर बंदीची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेत्याला फडणवीसांनी फटकारलं, म्हणाले…) तुमचा गट मोठा करण्यासाठी दुसऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून काय साध्य करू इच्छिता ? मनसे शिंदे गट एकत्र येणार नाही. मनसेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, असंही नाईक म्हणाले. भायखळ्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन शिंदे गटाकडून आमिष दिली जात आहे. वेगवेगळी पदं देणार असल्याचे सांगत आहे. शिंदे गटासमोर आधीच समोर एक शत्रू आहे, पण ते आणखी शत्रू का निर्माण करत आहे, त्याबद्दल कळत नाही. याबद्दल एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून विनंती केली आहे, असंही नाईक यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना समज द्यावी. शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करून त्यांच्या पायावर धोंडा मारून घेऊ नये, असा सल्लाही नाईक यांनी दिला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात