जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच! आता MIDC संदर्भातील नव्या GR ने ठाकरेंना झटका

मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच! आता MIDC संदर्भातील नव्या GR ने ठाकरेंना झटका

मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच! आता MIDC संदर्भातील नव्या GR ने ठाकरेंना झटका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक निर्णय घेत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 ऑगस्ट : एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने नवीन सरकार स्थापन केलं आहे. मात्र, सरकार स्थापनेनंतर शिंदे सरकारने आधीच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक धक्के दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी आधीच्या सरकारने मंजूर केलेले निधी रोखले आहेत. तर महाविकास आघाडीने घेतलेले महत्त्वाच्या निर्णयांना देखील स्थिगिती काढून नव्याने शासन आदेश काढण्यात आले आहेत. आता आणखी एक निर्णय घेऊन शिंदे सरकारने मागच्या सरकारला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. आता कोणत्या निर्णयाला स्थिगीती? शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विविध स्तरावर वाटप केलेल्या भूखंडाच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. एक नवीन शासन आदेश काढून 1 जून, 2022 नंतर केलेल्या भूखंडाच्या निर्णयांना स्थगिती​ देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही मविआच्या निर्णयांना स्थगिती सुरुच असल्याचे बोलले जात आहे. यावर विरोधी पक्ष सातत्याने टीका करत आहे. हे सरकार स्थगिती सरकार असल्याचंही विरोधी पक्षांनी म्हटले आहे. नवीन प्रभाग रचनेला स्थिगिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या 2017 सालाच्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने प्रभाग रचनेबाबत घेतलेले निर्णय रद्द ठरवण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचा दावा करत रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘दोघं दिल्लीत चकरा मारतात, पण पाळणा हलत नाही’, उद्धव ठाकरेंचा घणाघात शिंदे-फडणवीस सरकारचा विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांना रद्द किंवा स्थगित करण्याचं काम सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारची 3 ऑगस्टला पाचवी कॅबिनेट बैठक झाली. या बैठकीत वॉर्ड रचनांबाबत निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकारने काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना जाहीर केली होती. पण त्याबाबत घेतलेल्या निर्णयांना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये 2017 साली जी प्रभागरचना होती तशीच प्रभागरचना आगामी निवडणुकीतही असण्याची दाट शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात