जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊत यांना अखेर ईडीची अटक! 'या' दोन कारणामुळे कारवाई केल्याची माहिती

संजय राऊत यांना अखेर ईडीची अटक! 'या' दोन कारणामुळे कारवाई केल्याची माहिती

संजय राऊत यांना अखेर ईडीची अटक! 'या' दोन कारणामुळे कारवाई केल्याची माहिती

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अखेर अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै : मुंबईहून एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अखेर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथकं संजय राऊतांविरोधात तपास करत होते. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. जवळपास 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीने संजय राऊतांना याआधी दोनवेळा समन्स बजावले होते. पण राज्यसभेचं पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊतांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. अखेर ईडी अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास संजय राऊतांच्या घरावर छापा टाकला. संजय राऊत यांची सलग नऊ तास चौकशी केल्यानंतर हालचालींना वेग आला. त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राऊतांच्या भांडूप आणि दादर या दोन्ही घरांच्या बाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईतील बलार्ड पिअर भागातील ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अतिशय जलद वेगाने घडामोडी घडत होत्या. त्यामुळे राऊतांना आता अटक होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर ईडीने त्यांना अटक केली आहे. ईडीला तपासात सहकार्य न करणे आणि घरातून बेहिशेबी रोकड सापडल्याने त्यांना अटक केल्याची माहिती आहे. 9 तासांच्या चौकशीअंती संजय राऊतांवर मोठी कारवाई; घरातून मोठी रोख रक्कम जप्त खोटी केस तयार करुन अटक : सुनिल राऊत याआधी संजय राऊत यांची कपड्यांची बॅग आणि फाईल ईडी कार्यालयात बोलवण्यात आली. संजय राऊत यांचे भाऊ सुनिल राऊत बाहेर आल्यानंतर बॅग बाहेर पाठवण्यात आली आहे. यावेळी सुनिल राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की संजय राऊत यांना सकाळी 9 वाजता वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. तब्येत एकदम व्यवस्थित आहे. खोटी केस तयार करुन अटक दाखवली आहे. लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. पत्राचाळीचा उल्लेख कुठेही नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात