मुंबई, 25 फेब्रुवारी : शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Shiv Sena leader Yashwant Jadhav) हे आयकर विभागाच्या रडारवर आहेत. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली (Income Tax raid on Yashwant Jadhav house) आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे पथक यशवंत जाधव यांच्याघरी दाखल झाले आणि आयकर विभागाकडून धाड टाकून चौकशी करण्यात येत आहे. आयकर विभागाच्या या धाडीनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Shiv Sena's first reaction on IT raid on Yashwant Jadhav house)
महिन्याभरात महानगरपालिका निवडणुका होणार आहेत. आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे मनपाच्या शिपायांवरही धाड टाकतील. कारण, काही मनपाचे शिपाई आहेत ते कपड्यांवर धनुष्यबाण लावतात अशी मला माहिती मिळालीय. मराठी लोक आहेत लावतात... शिवसैनिक आहेत. तर त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात.
2024 पर्यंत सहन सुरू करायचंय
खोटे गुन्हे दाखल करतात. खोटे पुरावे तयार करतात. मी सांगतो आपल्याला 2024 पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे. हे महाराष्ट्राला सहन करायचं आहे. हे पश्चिम बंगालला सहन करायचं आहे. झारखंड, छत्तीसगढ आणि पंजाबलाही 2024 पर्यंत सहन करायचं आहे. 2024 नंतर पाहूयात.
वाचा : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतल्या घरी आयकर विभागाची धाड
डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे ट्वेल
संजय राऊत पुढे म्हणाले, डर्टी पॉलिटिक्स... आणि डर्टी पॉलिटिक्स करणारे भाजपचे ट्वेल आहेत. आदित्य ठाकरेंनी उत्तरप्रदेशात काल झंझावात निर्माण केला. आदित्य ठाकरेंच भाषण ऐकण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. आदित्य ठाकरे यांना उत्तर प्रदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाला तुमची लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात त्यामुळे गंगा जास्त मैली झालेली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न करा परंतु आमच्या तोंडातून सत्यच निघेल असंही संजय राऊत म्हणाले.
वाचा : ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन' नेत्यांची यादी घेऊन किरीट सोमय्या दिल्लीत दाखल
कुणाचा राजीनामा घ्यायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना
राजकीय फायद्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्यात येते आणि नंतर स्वत:च भाजप आंदोलन करते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनाही अधिकार आहे की, कोणाचा राजीनामा स्वीकारायचा आणि कोणाचा रिजेक्ट करायचा असंही संजय राऊत म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC, Raid, Sanjay raut, Shiv sena