मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sameer Wankhede यांना डबल झटका, ठाणे पोलिसांनी बजावलं समन्स अन् हायकोर्टानेही सुनावलं

Sameer Wankhede यांना डबल झटका, ठाणे पोलिसांनी बजावलं समन्स अन् हायकोर्टानेही सुनावलं

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता समीर वानखेडे यांना दुहेरी झटका बसला आहे.

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता समीर वानखेडे यांना दुहेरी झटका बसला आहे.

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता समीर वानखेडे यांना दुहेरी झटका बसला आहे.

मुंबई, 22 फेब्रुवारी : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. समीर वानखेडे यांना मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे पोलिसांनी (Thane Police) समन्स बजावलं आहे. ठाण्यातील कोपरी पोलीस स्टेशन (Kopri Police Station)मध्ये समीर वानखेडेंना 23 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. नवी मुंबईतील सद्गुरू बार अँण्ड रेस्टॉरंटचा मद्यविक्री परवाना खोट्या माहितीच्या आधारे समीर वानखेडे यांनी मिळवल्याचा आरोप आहे आणि त्याच प्रकरणात कोपरी पोलिसांनी त्यांना समन्स बजावले आहे.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच समीर वानखेडे यांच्या बारचा परवाना रद्द केला होता. समीर वानखेडे यांच्याविरोधात उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई वाशी येथून गुन्हा वर्ग केल्या नंतर कोपरी पोलीस ठाण्यात कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बारचा परवाना रद्द करण्याच्या आदेशाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वाचा : पुण्यात काँग्रेस ओबीसी सेलच्या मोर्चात तुफान राडा, मंत्री वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला चोपला

या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. समीर वानखेडे यांची याचिका इतक्या त्वरित आमच्यासमोर सुनावणीसाठी आलीच कशी असा सवालही उच्च न्यायालयाने उपस्थित करत फटकारले आहे.

सामान्य नागरिकांची नियमानुसार अनुक्रमाणे सुनावणीसाठी याचिका येते. मग एखादा प्रभावशाली व्यक्ती असेल तर तातड़ीने सुनावणी होणार का? असा सवालही उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या वकिलांना उपस्थित केला.

वाचा : नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर उलटवला डाव, कोर्टात घडली महत्त्वाची घडामोड

यासोबतच समीर वानखेडे यांनी या प्रकरणात अटकेविरोधातही याचिका दाखल केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षाने उत्तर देण्यास वेळ मागितला आहे.

काय आहे प्रकरण?

समीर वानखेडे यांच्या नावावर नवी मुंबईतल्या वाशी येथे एक बार आहे. उत्पादन शुल्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या बारसाठी 27 ऑक्टोबर 1997 रोजी परवाना दिला होता. या बारचे लायसन 31 मार्च 2022 पर्यंत वैध आहे. यावरुनच नवाब मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला होता. हे बार आणि रेस्टॉरंट आहे. वयाच्या 17व्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बाजवल्यानंतर कारवाई केली होती. वाशी येथील सतगुरु हॉटेल्स च्या लायसन्स मध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे काही त्रुटी आढळल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे या ठिकाणी परदेशी बनावटीची तसेच IMFL (भारतीय बनावटीची विदेशी मद्य) विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना समीर वानखेडेंनी म्हटलं होतं की, हॉटेलचा परवाना आपल्या नावे असला तरी 2006 मध्ये भारतीय महसूल सेवेत दाखल होताच पॉवर ऑफ अॅटर्नी वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या नावे केला.

दरम्यान या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू होती. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून बारचा परवाना रद्द करण्यात आला.

First published:
top videos

    Tags: Mumbai, NCB, Thane