Pune: पुण्यात काँग्रेस ओबीसी सेलच्या मोर्चात तुफान राडा, मंत्री वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला चोपला
Pune: पुण्यात काँग्रेस ओबीसी सेलच्या मोर्चात तुफान राडा, मंत्री वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला चोपला
पुण्यात काँग्रेसच्या मोर्चात तुफान राडा; वडेट्टीवारांच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्याला चोपला
पुण्यात काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या मोर्चात राडा झाला आहे. या मोर्चात एका कार्यकर्त्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोपला आहे. हा कार्यकर्ता भाजपचा असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
पुणे, 22 फेब्रुवारी : काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल (Congress OBC Cell)कडून आज पुण्यात मोर्चा (Pune) काढण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी आज पुण्यात केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस ओबीसी सेलने हल्लाबोल मोर्चा काढला. मात्र, या मोर्चात जोरदार राडा (clash in congress morcha) झाल्याचं पहायला मिळालं.
पुण्यात ओबीसी आरक्षणासाठी काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नाही तर काळा झेंडा दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील यांना धक्काबुक्की करत मारहाण सुद्धा केली.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. ढोले पाटील ओबीसीना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. त्यामुळे ते सुद्धा या मोर्चाच्या ठिकाणी आले. मात्र, त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ते पाहून संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोले पाटील यांना धक्काबुक्की केली.
वाचा : "राजकारणामुळे जगणं मुश्किल झालंय, बदनामी होत राहिली तर..." दिशाच्या आई-वडिलांचा इशारा
काँग्रेस शहराध्यक्ष, काँग्रेस ओबीसी प्रदेशाध्यक्ष या मोर्चात सहभागी झाले होते. त्याचवेळी अचानक मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली आणि अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल ढोले पाटील याला मारहाण सुद्धा केली. मृणाल ढोले पाटील हा भाजपचा पदाधिकारी असल्याचंही काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको - हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं, सातत्याने सरकारची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत. त्यासाठी काय करता येईल हे आम्ही केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे आम्हाला सांगितल होत की ट्रिपल टेस्ट करा. आम्ही ट्रिपल टेस्ट पुर्ण केल्या आहेत. यामधे कुठंही 50 टक्क्यांची मर्यादा आम्ही ओलांडत नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नक्कीच कोर्ट देखील आम्हाला न्याय देईल.
याबाबात निवडणूक आयोगाला देखील कळवलं होत त्याचं म्हणण आहे मागच्या निवडणूकीत कोर्टानं ओबीसी जागा ओपन प्रवर्गासाठी खुल्या केल्या होत्या तो आदेश बदलन गरजेचं आहे. त्यामुळें कोर्टानं या सुनावणीत तो आदेश बदलण्याबाबत सांगितल की आपोआपच आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होतील यामध्ये शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.