Home /News /mumbai /

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर उलटवला डाव, कोर्टात घडली महत्त्वाची घडामोड

नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर उलटवला डाव, कोर्टात घडली महत्त्वाची घडामोड

 नवाब मलिक आमची वानखेडे परिवाराची बदनामी करत आहेत असा आरोप वानखेडे परीवाराने मुंबई उच्च न्यायालयात केला होता

नवाब मलिक आमची वानखेडे परिवाराची बदनामी करत आहेत असा आरोप वानखेडे परीवाराने मुंबई उच्च न्यायालयात केला होता

नवाब मलिक आमची वानखेडे परिवाराची बदनामी करत आहेत असा आरोप वानखेडे परीवाराने मुंबई उच्च न्यायालयात केला होता

मुंबई, 21 फेब्रुवारी : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) आणि एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यातील वाद थांबण्याचे नावच घेत नाही. आज नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात हजेरी लावली आणि   प्रतिज्ञापत्र देखील न्यायालयात सादर केले. या प्रतिज्ञापत्रात आपण समीर वानखेडेंच्या वडिलांवर आरोप केलेच नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांवर डाव उलटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देवूनही नवाब मलिक हे आमची वानखेडे परीवारीची बदनामी करत आहेत टीका करत आहेत, हा न्यायालयाचा अवमान आहे असा आरोप करत समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर सुवावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाने अल्प संख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. शिवाय आपण न्यायालयाचा अवमान केला आहे, यामुळे आपल्या कारवाई का करु नये याचे उत्तर देखील न्यायालयात हजर राहून द्यावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचा मान ठेवत नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, ज्ञानदेव वानखेडे आणि समीर वानखेडेबद्दल केलेल्या कथित अवमानजनक विधानांच वापर करून खोटी अवमान याचिका दाखल केल्याचा दावा स्वतः मलिक कोर्टात उपस्थित राहून प्रतिज्ञापत्र दाखल केला. "मी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषदेत जे काही बोललो त्यात ज्ञानदेव वानखेडे किंवा समीर वानखेडे यांचा कुठेही उल्लेख केला नाही. तरीही वानखेडे यांनी माझ्याविरोधात अवमान याचिका दाखल करून त्यासोबत कोर्टात सादर केलेल्या माझ्या विधानांच्या उताऱ्यात स्वतःहूनच शब्द पत्नी करुन ते न्यायालयास सादर केलेत" असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी त्यांच्या प्रतिज्ञा पत्रात केला. नवाब मलिक यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले म्हणणे मांडण्याकरता आणि प्रत्युत्तरादाखल प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना देऊन न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी पुढील सोमवारी ठेवली आहे. आता ज्ञानदेव वानखेडे हे त्यांची काय बाजू मांडतायेत? तसंच न्यायालयाच्या आदेशानंतर ही वानखेडे परिवाराविरोधात नवाब मलिक यांनी अपमानजनक कसे आणि काय वक्तव्य केलंय. हे ज्ञानदेव वानखेडे न्यायालयाला कसं पटवून देतात, हे येत्या सोमवारी स्पष्ट होईल. जर वानखेडे ते स्पष्ट करु शकले नाही तर नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांना वानखेडे परिवाराला सामोरे जावे लागेल.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या