मुंबई, 24 सप्टेंबर : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संपूर्ण जग लॉकडाऊन झाले होते आणि याच काळामध्ये अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या सुद्धा लागल्या. यातून अनेक तरुणांनी पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढले. यातीलच एक मुंबईतील सचिन डेडीया नावाचा इंजिनिअर तरुण आहे. ज्याची कोरोना काळात नोकरी गेली, पण त्याने कुठलाही संकोच न बाळगता हाती येईल ते काम केलं. सचिननं सुरुवातीला कुरिअर डिलिवरी करण्याचे काम केले.
त्यानंतर त्याला अचानक सुचले की आपण आपल्या घरगुती व्यवसायात हातभार लावला तर आपली आर्थिक कमाई वाढेल. यामुळेच सचिनने 25 वर्ष जुन्या घरातील व्यवसायास बळ देण्याचे ठरवले आणि परंपरागत सुरू असलेला नाश्ता, फराळ अन् स्नॅक्स विक्री करायला सुरुवात केली. त्याचसोबत सोशियल मीडियामध्ये बिजनेस अकाऊंट तयार करून ग्राहकांना हे पदार्थ ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. चर्चगेट स्थानकाबाहेर सचिन व त्याची आई नाश्ता विक्री स्टॉल लावतात. या स्टॉल वर 35 पेक्षा जास्त पदार्थ खवय्याना मिळतात. गरमागरम 21 प्रकारचा नाश्ता येथे मिळतो. 17 प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत.
हेही वाचा : Nashik : जेवणासोबत घ्या पुस्तकांची मेजवानी; 75 वर्षांच्या आजींचे लय भारी हॉटेल, VIDEO
नोकरी गेल्याचं दुःख बिलकुल नाही
सचिन म्हणतो की; मला आता नोकरी गेल्याचं दुःख बिलकुल नाहीये कारण मी या स्टॉल चा स्वतः मालक आहे. महिन्याला अडीच लाखाच्या आसपास माझा टर्नओवर होतो. नोकरीत मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी व्यवसायातून कमवतो.
व्यवसाय आता सचिन सांभाळतो याचा आनंद आहे
सचिनची नोकरी गेल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं नाही कारण त्या काळात परिस्थिती वाईट होती. पण आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध असल्यामुळे आम्हाला ताण नव्हता. मी गेल्या 25 वर्षांपासून सांभाळत असलेला व्यवसाय आता सचिन सांभाळतो याचा मला आनंद आहे, असं सचिनच्या आई सुरेखा डेडिया सांगतात.
वर्क फ्रॉम होम बंद होऊन ऑफिस जेव्हा सुरु झाले तेव्हापासून मी या ठिकाणावरून नाश्ता घेते. या ठिकाणी फ्रेश नाश्ता मिळतो. या ठिकाणी वडा, ढोकळा आणि आलू पराठा या ठिकाणी चांगला मिळतो, असं खवय्ये सांगतात.
हेही वाचा : मटकीचा चमचमीत रस्सा आणि टम्म फुगलेली पुरी; 'समाधान'ने जपली 23 वर्षांची परंपरा, VIDEO
चाकरमान्यांच्या पोटाला आधार कसा ठरतोय हा स्टॉल?
सतत धावणाऱ्या या मुंबईत लांबचा पल्ला गाठत सकाळी अनेक लोक कामावर येतात. अनेक जन तर पहाटेच घरातून निघतात. त्यामुळे या चाकरमान्यांसाठी हा नाश्ता स्टॉल एक आधार ठरतोय.
इथे काय काय मिळते?
गरम नाश्ता, दुधी मुठीया - 50, इडली - 4 पालक, मुगडाळ, मसाला ढोकळा -5 प्रकार, अळूवडी - कोथिंबीर वडी, पराठे, थेपला, पुरणपोळी, फराली पॅटीस, साबुदाणा खिचडी, स्नॅक्स-शेव, मकई पोहा चिवडा, खस्ता कचोरी, गोल कचोरी, स्प्रिंग रोल, खाकरा, शंकरपाळी, केळीचे वेफर्स, चकली, भाकरवडी, चायनीज समोसा या ठिकाणी मिळतो.
या स्टॉलचा पत्ता, वेळ, संपर्क क्रमांक
चर्चगेट स्थानकाच्या बाहेर, बस स्थानकाजवळ
वेळ सकाळी 7 ते सकाळी 11
संपर्क क्रमांक - सचिन डेडीया - 8850253026
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai