जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? 'कडू' वादावरून शिवसेनेनं रवी राणांना डिवचलं

हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? 'कडू' वादावरून शिवसेनेनं रवी राणांना डिवचलं

 मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको,

मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको,

मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको,

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 03 नोव्हेंबर : ‘रवी राणा हे फडणवीस यांना मानणारे आमदार आहेत व ते पक्के हनुमान भक्त आहेत. हनुमानाचा भक्त खोटे बोलेल काय? एकवचनी, सत्यवचनी रामाचा भक्त बजरंगबली रामाचे नाव घेऊन खोटे कसे बोलू शकेल? राणा यांचा राम कोण व बोलविता धनी कोण? याचा शोध कडू यांनी घेतला तर सत्याचा पट उलगडला जाईल. आता कितीही दिलगिरीचा मुलामा देऊन राणा यांनी माघार घेतली असली तरी या हनुमान भक्ताने आधी जे पन्नास पन्नास खोक्यांचे सत्य जाहीर केले, ते काय त्यांच्या श्रीरामाची मान्यता असल्याशिवाय? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने रवी राणा आणि बच्चू कडू वादावर निशाणा साधला. आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये 50 खोके घेण्याच्या वादावरून चांगलाच कलगीतुरा रंगला होता. याच मुद्यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. तसंच, रवी राणांची खिल्लीही उडवली आहे. (कोथळ्याची भाषा करणारे फुलावंर आले? रवी राणांच्या पलटवारानंतर काय म्हणाले बच्चू कडू? VIDEO) अमरावतीमधील दोन आमदार बच्चू कडू व रवी राणा यांच्यात एखादा तात्त्विक वाद राज्याच्या पिंवा लोकांच्या विकासासाठी घडला असता तर समजण्यासारखे होते. विदर्भातील मोठे उद्योग गुजरातमध्ये पळवून नेले व वैदर्भी जनतेचा लाखोंचा रोजगार बुडाला म्हणून या दोघांत भांडण पेटले असते तरीही ते समजून घेता आले असते. विकासासाठी निधी कमी पडत आहे, ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत यावर दोन आमदारांनी शब्दांची ढाल-तलवार चालवली असती तरी जनतेने त्यांचे स्वागत केले असते व त्यांच्या तोंडून निघालेली चिखलफेक सहन केली असती, पण दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरून सुरू झाले व महाराष्ट्राने तमाशा पाहिला. तरी बच्चू कडू यांची वेदना समजून घेतली पाहिजे. कडू म्हणतात, कालपर्यंत आपली ओळख शेतकरी-कष्टकऱ्यांचा पैवारी, दिव्यांगांना मदत करणारा आमदार अशी होती, पण आता एखाद्या लग्नात गेलो तरी ‘आला आला, खोकेवाला आला’ असे हिणवले जाते. हे आता सहन करता येणार नाही, असा टोला सेनेनं कडूंना लगावला. (‘गुलाबराव पाटलांच्या कारकिर्दीत मोठा घोटाळा…’ शिंदे गटाच्या मंत्र्यावर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप) महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या मनात 50 आमदारांची प्रतिमा ‘खोकेवाले’ अशीच आहे व हे आमदार कोठेही गेले तरी त्यांना ‘खोकेवाले’ असेच म्हटले जाणार. पन्नास आमदारांचे सरकार हे बेकायदेशीर आहे. घटनेच्या पायावर ते उभे नसून प्रत्येकी पन्नास कोटींच्या खोक्यांवर ते उभे आहे. त्यामुळे त्यांच्यात एकजिनसीपणा नाही. नैतिकता आणि विचारांचे सूत्र नाही. महाराष्ट्राविषयी आस्था नाही. मिंधे गटाचे एक मंत्री गुलाब पाटील यांनाही खोक्यांचा आरोप काट्यांप्रमाणे टोचला आहे व त्यांनीही खोक्यांचा आरोप करणाऱ्या राणा यांच्यावर डोळे वटारले. मात्र याच गुलाब पाटलांवर त्यांच्याच जिल्ह्यातील मिंधे आमदार चिमण पाटील यांनी हल्ला केला. कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्याची इज्जत खुंटीला टांगून सरकार चालवले जात आहे’अशी टीकाही सेनेनं केली. शेती मंत्री अब्दुल सत्तार यांनी तर बीडच्या कलेक्टरला भर बैठकीत विचारले, ‘‘आपण दारू वगैरे पिता की नाही?’’ कलेक्टर यांनी सांगितले, ‘‘होय, आम्ही पितो अधूनमधून.’’ यावर सत्तारांच्या मागून कुणी तरी जिभेची टाळी वाजवली- ‘‘आमचे साहेब दारू पित नाहीत, पण खोके घेतात!’’ असा एकंदरीत महाराष्ट्राच्या इज्जतीचा खेळखंडोबा जागोजाग सुरू आहे. राज्याच्या प्रश्नांवर ना मुख्यमंत्री बोलतात ना त्यांचे वाचाळ मंत्री. मिंधे-फडणवीसांच्या सरकारने प्लॅस्टिक बंदीप्रमाणे उद्या राज्यात खोकेबंदी केली तरी आश्चर्य वाटायला नको, कारण कोणतेही खोके दिसले की लोकांना पन्नास बेइमान आमदारांचीच आठवण होणार’ असा टोलाही सेनेनं शिंदेंना लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात