जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / गद्दारी ते बंद खोलीतील बैठक.. राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 मोठे 'प्रहार'

गद्दारी ते बंद खोलीतील बैठक.. राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 मोठे 'प्रहार'

गद्दारी ते बंद खोलीतील बैठक.. राज ठाकरे यांच्या भाषणातील 5 मोठे 'प्रहार'

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट : शस्त्रक्रियेनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरले आहेत. मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात मनसेचा मेळावा सुरू आहे. यात राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजपसह अनेक राजकीय पक्षांवर आणि नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल? याबद्दल पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या या भाषणातील ठळक मुद्दे जाणून घेऊ. गद्दारी नाही तर.. : राज ‘या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं आणि बाहेर पडला आहे. बाळासाहेबांना जेव्हा कळलं की हा काही राहत नाही. ही शेवटची भेट आहे. पण निघताना मनोहर जोशी तिथे होते, जोशी बाहेर गेल्यानंतर मला बाळासाहेबांनी भेटायला बोलावलं आणि हात पसरवून मिठी मारली आणि जा म्हणून सांगितलं. त्यांना समजलं होतं, त्यामुळे मी दगा फटका करून, खंजीर खुपसून बाहेर गेलो नाही. बाहेर जाऊन कुठल्या पक्षात गेलो नाही, तुमच्या बळावर पक्ष उभा केला’ ही तर तात्पुरती आर्थिक सोय : राज ठाकरे जे आता सगळं चालू आहे ना, ही चांगली गोष्ट नाही. आधी महाराष्ट्रामध्ये असं काहीही नव्हतं. 2019 ला मतदारांनी मतदान केलं ना, त्याला कळत सुद्धा नसेल कुणाला मतदान केलं. कोण कुणामध्ये मिसळलं हे कळत सुद्धा नसेल. हे जर राजकारण असं तुम्हाला वाटत असेल तर हे तात्पुरती आर्थिक सोय आहे, असा निशाणाही त्यांनी शिंदे गटावर साधला. ते पुढे म्हणाले, की मी मुलाखतीत सुद्धा सांगितलं होतं. भुजबळ, नारायण राणे यांचं बंड झालं. त्यांनी बंड केलं आणि एका पक्षात गेले. नुपूर शर्मांच्या वक्तव्याचं समर्थन नुपूर शर्मा काय बोलल्या, त्यांची माफी काय बोलून घेतली. मी त्यांची बाजू घेतली. झाकीर नाईक हा मुस्लिम आहे, त्याने मुलाखतीत सांगितलं होतं, तेच नुपूर शर्मांनी सांगितलं. त्याबद्दल कुणी काही बोललं नाही. त्यांचं बोलणं अजून सुरूच आहे. हरामखोर ओवेसी आमच्या देवी दैवतांबद्दल बोलतो, गणपती, लक्ष्मी यांच्याबद्दल बोलला म्हणे, मनहूस नाव ठेवतात. आमच्या देवाला नाव ठेवली, त्याला कुणी काही बोललं नाही. देशामध्ये चांगले मुस्लिम झाले. पण या लोकांना कुणी बोलायला तयार नाही, त्यांच्या जिभेला बंधन घालायचा सरकार तयार नाही. कवी इक्बाल याने सारे जँहा से अच्छा हिंदुस्तान म्हणत आहे आणि आम्ही हिंदू भारत म्हणत आहोत. नाहीतर सोप आहे इंडिया, एवढ्या गोष्टी एवढ्या घटना आहे, कुणाला गांभीर्य नाही.

‘नुपूर शर्मा स्वतःच्या मनातलं बोलल्या नाहीत, तर..’, राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

मुख्यमंत्रीपदावरुन उद्धव ठाकरेंवर टीका शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली होती. मला आजही आठवतं मी त्यावेळी बैठकीला हजर राहत होतो. कधी घरी बैठका व्हायच्या किंवा सेंटार हॉटेलमध्ये बैठक व्हायची. त्यावेळी मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते हजर होते. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. जर हे ठरलं होतं तर मग 2019 ला मागणी कशीच करू शकता. शिवसेने आमदार कमी आले होते. चार भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली होती. त्या चार भिंतीमध्ये होतं तरी कोण, एकतर हे खोटं बोलताय नाहीतर ते खोट बोलताय. मुळात तुम्ही मागितलं कसं, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग तुम्ही मागताच कसे? पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शाहांनी सुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. त्याच वेळी फोन का केला नाही. त्याचवेळी भेटला का नाही, तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळ बोलत आहात. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं. मग काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मतदारांचा विश्वासघात मग लोकांनी मतदान कुणाला केलं. असं समजूया शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं. लोकांना असं वाटत असेल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार नको म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हीच त्यांच्यासोबत कसं गेला? हिंमत कशी होते. मतदानांची किंमत कशी केली नाही. जोपर्यंत लोक या सरकारला विचारत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात