जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Panvel Ganesh Immersion : गणपती सोडताना वाहून गेलेले दोन मुस्लीम बांधव तब्बल 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडले

Panvel Ganesh Immersion : गणपती सोडताना वाहून गेलेले दोन मुस्लीम बांधव तब्बल 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडले

Panvel Ganesh Immersion : गणपती सोडताना वाहून गेलेले दोन मुस्लीम बांधव तब्बल 15 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सापडले

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुण वाहून गेल्याची घटना मागच्या दोन दिवसांपूर्वी घडली होती. (Panvel Ganesh Immersion) अग्निशामक दल, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री त्यांचा शोध घेण्यात आला

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पनवेल, 07 सप्टेंबर : पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुण वाहून गेल्याची घटना मागच्या दोन दिवसांपूर्वी घडली होती. (Panvel Ganesh Immersion) अग्निशामक दल, पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने रात्री त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते मिळाले नाहीत. दरम्यान काल सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू होती यामध्ये त्या दोघांना शोधण्यात यश आले आहे. तब्बल 15 तासांनी त्यांना शोधण्यात यश आले आहे. अग्निशामक दल व पोलिसांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.

जाहिरात

कोपरोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी गेले होते. दरम्यान रात्री भोरदार (गाढी) नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. त्याला वाचवण्यासाठी एक जण गेला असता तोही वाहून गेला.

हे ही वाचा :  Pune Rain Alert : थरारक! बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला वाचवले video आला समोर

त्यानंतर दुसरा बॅटरी घेऊन धावत आला तो देखील वाहत गेला त्याच्या पाठोपाठ आलेले अन्य तिघेजण देखील वाहून जाऊ लागले. रात्रीची वेळ असल्याने यातील दोघेजण बेपत्ता झाले. तर चौघेजण बाहेर निघाले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

बारामतीमध्ये वाहून जाताना एकाला वाचवले

बारामती तालुक्यातील पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस पडला आहे. अनेक गावांमध्ये ओढय़ा नाल्यांना पूर आला आहे. नीरा बारामती रस्त्यावरील अनेक पूल ओढ्याच्या पुराच्या पाण्याखाली गेली असून वाहतूक ठप्प झाली आहे. (Pune Rain Alert) बारामती तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तालुक्याशी तुटला आहे. दरम्यान नीरा बारामती रस्त्यावरील फरांदेनगर येथील ओढ्यावर पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीला तेथील स्थानिक युवकांनी ट्रॅक्टरवर दोरीच्या साहाय्याने वाचवले आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  Rain Alert Maharashtra : अनंत चतुर्थी पावसात जाणार, ‘या’ जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

पुरंदर आणि बारामती तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने ओढेनाले भरुन वाहू लागले आहेत. त्यामुळे कोरडी असणारी कऱ्हा नदी आता दुथडी भरुन वाहू लागली आहे. नाजरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांना देखील जलसंपदा विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात