मुंबई 19 ऑगस्ट: कोरोनानंतर 2 वर्षांनी दहीहंडीचा जल्लोष आणि उत्साह राज्यभरात आहे. मुंबई-ठाण्यात यंदा हा उत्साह अधिक जास्त आहे. दहीहंडी ट्राफिक पोलिसांनी महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. तुम्ही जर मुंबईत प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दहीहंडीचा जल्लोष तर रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत या रस्त्यांवरून प्रवास करण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल तर तुम्ही पर्यायी मार्गाचा विचार करूनच घराबाहेर पडा. विकेण्डचा प्लॅन खराब करायचा नसेल तर घराबाहेर पडण्याआधी पाहा Traffic Alert मध्य मुंबईतील दादर परिसरातील पाच रस्ते शुक्रवारी जन्माष्टमीच्या उत्सवाशी दहीहंडी निमित्त वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. पनेरी जंक्शन ते दादर (पश्चिम) रेल्वे स्टेशनपर्यंत रानडे रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. डी सिल्वा रोड विसावा हॉटेल ते दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकापर्यंत बंद असेल. कबुतराखाना ते दादर (पश्चिम) रेल्वे स्टेशनपर्यंत एम सी जावळे रोड बंद राहील. नवीन प्रभादेवी रस्ता धनमिल नाक्यापासून तर राजाभाऊ देसाई रस्ता प्रभादेवी नाका ते आप्पासाहेब मराठे रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे हे मार्ग सोडून तुम्ही इतर मार्गावरून प्रवास करू शकता. कळवा स्थानकात संतापलेल्या प्रवाशांनी रोखली लोकल, नेमकं काय घडलं विकेण्डसाठी तुम्ही जर प्लॅन केला असेल तर तुम्हाला या रस्त्यांवरून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बाहेर पडण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग निवडता येईल का हे देखील पाहाणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.