मुंबई, 1 सप्टेंबर : मुंबईच्या कफ परेड परिसरात, थेट पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Mumbai Crime) याप्रकरणी नौदलाचे दोन आणि सीआयएसएफच्या दोन अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. मिळालेल्या माहितीनूसार हे चारही जवान कफ परेड परिसरात टॅक्सीने फिरत होते. यावेळी एका जवानाने टॅक्सीत सिगरेट पेटवली. ज्याला टॅक्सी ड्रायव्हरने विरोध दर्शवला. संतप्त जवान आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात वाद सुरू असताना, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच या जवानांनी हात उगारला. मारहाण झाली त्यावेळी हे सर्व जवान मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात आले आहे.
मुंबईत पोलीस आणि 4 जवानांमध्ये जोरदार मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान ही घटना मुंबईच्या कफ परेड परिसरात घडली. या चार जणांपैकी 2 नेव्हीतील जवान होते तर दोघेजण cisf मध्ये काम करत असल्याची माहिती आहे. मध्यस्थी करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाच त्यांनी थेट मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौदलाचे दोन आणि सीआयएसएफच्या दोन अशा चौघांना अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा : पुणे : नशेत इमारतीच्या खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न, चौथ्या मजल्याहून कोसळून मृत्यू, विचलित करणारं दृश्य
पोलीस अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीय. मिळालेल्या माहितीनूसार हे चारही जवान कफ परेड परिसरात टॅक्सीने फिरत होते. यावेळी एका जवानाने टॅक्सीत सिगरेट पेटवली. ज्याला टॅक्सी ड्रायव्हरने विरोध दर्शवला. संतप्त जवान आणि टॅक्सी ड्रायव्हर यांच्यात वाद सुरू असताना, मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच या जवानांनी हात उगारला. मारहाण झाली त्यावेळी हे सर्व जवान मद्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगण्यात आले आहे.
मुंबईत सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कफ परेडमधील रस्त्यावर असलेल्या अशाच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी कफ परेडमध्ये फिरण्यासाठी आले होते. आरोपींनी दुपारचे जेवण केल्यानंतर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली. टॅक्सीने काही अंतर कापल्यानंतर एका आरोपीने टॅक्सीतच सिगारेट पेटवली. याला टॅक्सी चालकाने विरोध केला.
हे ही वाचा : ‘काय दारु…काय चकणा..समदं कसं ओके’; युवासेनेचा शहाजीबापूंना टोला, दिली मातोश्रीवर नोकरीची ऑफर
मात्र, आरोपींनी टॅक्सी चालकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सिगारेटच्या मुद्यावरून टॅक्सी चालक आणि आरोपींमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या घटनेची माहिती मिळताच एक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करू लागले. पोलिसाच्या मध्यस्थीने संतापलेल्या आरोपींनी उलट पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण केली. पोलिसांनी या मारहाणीनंतर चौघांना अटक केली.