जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ''आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार'', किशोरी पेडणेकर

''आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार'', किशोरी पेडणेकर

''आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार'', किशोरी पेडणेकर

Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जानेवारी: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray Birth Anniversary)आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे. आजच्या दिवशी स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर दाखल होत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संवाद साधणार आहे. आज आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल. आमचा भाऊ आम्हाला भेटणार आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा संघर्ष होता. 30 ते 35 वर्ष तर नक्कीच त्यांच्याबरोबर काम केलंय, असंही त्या म्हणाल्यात. तसंच कोणतीही महिला त्यांच्या निवासस्थानी गेली तर आधी समोर माँसाहेबांच्या येथून कुंकू लावलंच पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

जाहिरात

तळागाळातल्या लोकांना त्यांनी महापौर, मंत्रिपद अशा अनेक संधी दिल्या. पैसे घेऊन तिकीट देता असे आरोप कधीच झाले नाहीत, असंही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांशी साधणार ऑनलाईन संवाद शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज शिवसैनिकांसोबत संवाद (Uddhav Thackeray will interact with Shivsainik) साधणार आहेत. आज ऑनलाईन माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. आज 23 जानेवारी म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसैनिकांना काय आदेश देणार? येत्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका लक्षात घेता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना काय आदेश देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे रात्री 8 वाजता शिवसैनिकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात