मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai Crime : चक्क, शाळेत शिकणाऱ्या पोरांना गांज्या विकताना सापडली महिला

Mumbai Crime : चक्क, शाळेत शिकणाऱ्या पोरांना गांज्या विकताना सापडली महिला

मुंबईच्या बोरिवली एमएचबी पोलिसांकडून काल (दि.23) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या बोरिवली एमएचबी पोलिसांकडून काल (दि.23) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या बोरिवली एमएचबी पोलिसांकडून काल (दि.23) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 23 सप्टेंबर : मुंबईच्या बोरिवली एमएचबी पोलिसांकडून काल (दि.23) मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली आहे.आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत 2000 रुपये इतकी आहे.

दहिसर भागातील एका उद्यानात शालेय गणवेशात काही मुले धूम्रपान करत असल्याचे शिवसैनिकाच्या लक्षात आले. ही बाब शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी यांना फोन द्वारे कळवण्यात आली यानंतर शाखाप्रमुखाने सदर ठिकाणी जाऊन त्या मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा :  सावधान! मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video

यापैकी तीन मुले पळून जाण्यात यशस्वी झाली. मुले पळाल्यामुळे काहीतरी गैरप्रकार होत असल्याचं ध्यानात येतात कवळी यांनी त्या मुलाला नाव आणि शाळेचे नाव विचारून माहिती घेत ही बाब पोलिसाना कळवली.

यानंतर एम.एच.बी पोलिसांनी गणपत पाटील नगर गल्ली नंबर 1 मधून एका ड्रग विकणारी 52 वर्षीय मुस्लिम महिलेला काल दुपारी अटक केली आहे. अटक आरोपी महिला गेल्या काही वर्षांपासून शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांना ड्रग विक्री करण्याचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग विकणारी महिलेला अटक केल्यानंतर घटनेची माहिती मिळतात बोरिवली आणि दहिसर पश्चिमच्या परिसरामध्ये शाळेत शिकणाऱ्या मुलांचा पालकांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. अटक आरोपी महिलेकडून अधिक तपास एम.एच.बी पोलीस करत आहेत. 

हे ही वाचा : लग्नाला 10 वर्ष होऊनही मूल झालं नाही; साताऱ्यातील दाम्प्त्याने उचललं धक्कादायक पाऊल

मात्र या संदर्भात शिवसेना शाखा प्रमुख भुपेंद्र कळवी यांनी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्याकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बोरिवली आणि दहिसर पश्चिम परिसरामध्ये मोठा संख्येत ड्रग पॅडलर आहेत जे शाळेच्या मुलांना ड्रगचा विळख्यामध्ये घालत आहेत, अशा सर्व ड्रग पॅडलरवर कारवाई करण्यात यावी असे कळवी म्हणाले.

First published:

Tags: Crime news, Drug case, Mumbai, Mumbai News

पुढील बातम्या