जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai Crime : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत जबरी चोरी

Mumbai Crime : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत जबरी चोरी

Mumbai Crime : मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत बीएमसी अधिकारी असल्याचे सांगत जबरी चोरी

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रूची वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा (मुंबई), 24 नोव्हेंबर : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्ती असलेल्या लोखंडवाला परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगून घरात घुसून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली होती. दरम्यान त्या व्यक्ती ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय बाबू धोत्रे (वय 24) असून आरोपीस ओशिवरा पोलिसांनी खार रेल्वे परिसरातून अटक केली आहे.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोखंडवाला आयर्लंड पार्कमध्ये राहणाऱ्या मंजू जैन यांच्या घरात नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान 11 नोव्हेंबर रोजी अक्षय धोत्रे नावाच्या इसमाने बीएमसी वेस्ट मेंटेनन्स विभागातून आल्याचं सांगून घरात प्रवेश केला. घरात सुरू असलेलं रिन्यूएशनचं काम हे बेकायदेशीर असल्याचे सांगत या कामावर कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपये मागितले.

हे ही वाचा :  आधी पूर्ण गावातील लाईट बंद केल्या; मग चौकातच कोयत्याने हल्ला, भावाकडूनच 15 वर्षीय मुलाची हत्या

मात्र फिर्यादीने ते देण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांच्या गळ्यातील चैन ओढून पळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घरात काम करणारा कामगारांना चुकवून आरोपी पळून गेला. या संबंधीची तक्रार फिर्यादी यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये स्वतः येऊन दिली.

तक्रार दाखल झाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी तपासासाठी पथक बनवले. गुप्त बातमीदाराकडून तसेच सीसीटीव्ही फुटेजमधील प्राप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यात आला.

जाहिरात

हे ही वाचा :  धक्कादायक! मनमाडमध्ये रेल्वेत प्रवाशांवर माथेफीरूचा अ‍ॅसिड हल्ला; चार जण जखमी

गुप्तहेराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी खार रेल्वे परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सापळा रचून आरोपीला मोठया शिताफीने पकडण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात