मुंबई, 22 ऑक्टोबर : दिवाळी तोंडावर आल्याने शहरात जागोजागी फटाक्यांचे मोठे स्टॉल लागले आहेत. यामुळे फटाक्यांच्या स्टॉलला आग लागण्याच्या घटना घडत असतात. मुंबईतील नालासोपाऱ्यात कबुतरांमूळे फटाक्याच्या स्टॉलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क रोडवर फटाका्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलवरून हायटेन्शन विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांवर कबुतरे बसत असल्याने आज सकाळी विजेच्या तारांतून उडालेली विजेची ठिणगी एका स्टॉलच्या छतावर पडली व त्याने स्टॉलला पेट घेतला.
याबाबतची माहिती वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर फटाक्यांनी पेट घेण्याआधी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र आग विझविताना फटाके भिजल्याने फटाके विक्रेत्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या स्टॉलच्या शेजारी पाच ते सहा स्टॉल होते त्यामुळे परंतु ही आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
हे ही वाचा : 200 रुपयांची थाळी पडली 8 लाखांना, मुंबईकर महिला ‘जमतारा’ scam ला बळी
दिवाळीच्या तोंडावर पुण्यात दुर्दैवी घटना
ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. शहारातील सदाशिव पेठमध्ये एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेमध्ये एका 10 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील भिकारदास मारुती जवळ एका हॉटेलमध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. अग्निशमन दलाचे 3 वाहने दाखल झाली. हॉटेलमधून 3 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. या आगीमध्ये एक 10 वर्षांची मुलगी अडकली होती. हे ही वाचा : अंगाला चिखल अन् लोशन लावून मध्यरात्री करायचे घरफोडी, मध्यप्रदेशमधील टोळीला पुण्यात अटक या मुलीला जवानांनी बाहेर काढले असून जखमी अवस्थेत अग्निशमन दलाच्या वाहनातून जवळच्या सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झाला. दुकानाला आग कशामुळे आणि का लागली याचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही. मात्र, या चिमुरडीच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.