मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काउंटडाऊन सुरू! शिंदे गटातील 16 आमदारांचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला? या आहेत शक्यता

काउंटडाऊन सुरू! शिंदे गटातील 16 आमदारांचा उद्या सुप्रीम कोर्टात फैसला? या आहेत शक्यता

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मागील सुनावणीत लेखी बाजू मांडण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीचे वेळापत्रक उद्या ठरण्याची शक्यता आहे. शिवाय सर्व पक्षकारांना लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यानुसार ठाकरे गट, शिंदे गट आपली बाजू मांडणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडील प्रक्रिया सुरू ठेवण्याबाबत सुप्रीम कोर्टाकडे विनंती केली होती. त्यानुसार 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत कोर्टानं निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार असून एकनाथ शिंदे यांच्या वतीने संजय किशन कौल तर सुभाष देसाई यांच्या वतीने कपील सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे ज्येष्ठ वकील बाजू मांडणार आहेत. तर केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ते तुषार मेहता बाजू मांडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे न्यायाधीश

1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड

2.न्यायमूर्तीं एम आर शहा

3.न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी

4.न्यायमूर्तीं हिमाकोहली

5. न्यायमूर्तीं पी नरसिंहा यांचा

वाचा - संजय राऊतांवर अटकेची टांगती तलवार? न्यायालयाकडून पुन्हा समन्स

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे ही सुनावणी सुरू आहे. त्यामुळं हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यांचा विचार केला होता. हे थोडक्यात जाणून घेणं महत्त्वाचे आहे.

1. स्पीकरच्या विरोधात अविश्वास नोटीस दाखल केली असेल तर उपाध्यक्षांना आमदारांना अपात्र करण्याचे अधिकार राहतो का? नेबम रेबिया जजमेंट नुसार.

2. अपात्रता प्रलंबित असताना विधानमंडळातील कामकाज वैध आहे का? त्याचं काय स्टेट्स आहे.

3. जर स्पीकरने अपात्र घोषित केले तर ज्या दिवशी आमदारांनी शिस्तभंग कारवाई केली त्या दिवशी लागू होते की ज्या दिवशी अपात्र केले त्या दिवसापासून.

4. अध्यक्षाला नेता/व्हीप ठरवण्याचा अधिकार आहे का? याचा 10व्या अनुसूचीवर पक्षांतर बंदी कायद्यावर काय परिणाम होतो का?

5. पक्षाच्या अंतर्गत निर्णय यात न्यायालयाने लक्ष घातले पाहीजे का?

वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणात कळीचा झालेला 'खोके' शब्द आला तरी कुठून?

6. राज्यपालाचे एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यास आमंत्रित करण्याचे काय अधिकार आहेत. असे अधिकार चॅलेंज करता येतात का? निवडणूक आयोगाबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 27 सप्टेंबरला  निर्णय दिला आहे.

7. स्प्लिटच्या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाला काय अधिकार आहेत. निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र किती मोठे आहे.

या संदर्भात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेना नक्की कोणाची या संदर्भात निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे.

उद्या काय होणार?

या सर्व घटनात्मक मुद्द्यासंदर्भात सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एक वेळापत्रक ठरवून देण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav tahckeray