मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सायरस मिस्त्री यांच्या कारचा शेवटचा CCTV Video; तेथून 20 किमीवर झाला दुर्देवी शेवट 

सायरस मिस्त्री यांच्या कारचा शेवटचा CCTV Video; तेथून 20 किमीवर झाला दुर्देवी शेवट 

सायरस मिस्त्री यांच्या कारच्या शेवटच्या व्हिडीओतून अपघातामागील कारण समोर आलं आहे.

सायरस मिस्त्री यांच्या कारच्या शेवटच्या व्हिडीओतून अपघातामागील कारण समोर आलं आहे.

सायरस मिस्त्री यांच्या कारच्या शेवटच्या व्हिडीओतून अपघातामागील कारण समोर आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद हायवेवर रस्ते अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. ते गुजरातमधील उदवाडा येथील पारसी मंदिरातून परतत होते. 54 वर्षीय मिस्त्री यांची मर्सिडीज GLC 220 कार पालघरजवळील एका डिव्हायरडला धडकली. या अपघातात मिस्त्री आणि त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. तर कार ड्राइव्ह करणारी महिला डॉक्टर अनायता पंडोले आणि तिचे पती दरीयस पंडोले जखमी आहेत. दरीयस JM फायनॅन्शियलमध्ये CEO आहेत.

दरम्यान सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीजचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. सायरस मिस्त्री ज्या लग्झरी मर्सिडीज कारने प्रवास करीत होते. ती कार 134 किलोमीटर प्रती तास वेगाने धावत होती. याचा खुलासा कारच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आला आहे. कारने रविवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी चरोतीचा चेक पोस्ट क्रॉस केला होता. येथून अपघाताची जागा साधारण 20 किमी अंतरावर आहे. मर्सिडीज कारने हे अंतर अवघ्या 9 मिनिटात पार केलं. ओव्हर स्पीडिंगमुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे मृत्यूचं कारण?

शवविच्छेदन अहवालानुसार या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीरातील अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली होती. ज्याला वैद्यकीय भाषेत पॉलीट्रॉमा म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालावरून मर्सिडीज कारच्या भीषण अपघाताचा अंदाज लावता येईल की, गाडीचा वेग किती जास्त असू शकतो.

मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती सायरस मिस्त्रींची मर्सिडीज; ती बचावली मात्र...

जेजे रुग्णालय प्रशासनाने सायरस मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पंडोळे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कासा पोलीस स्टेशनला (अपघात झाला त्याठिकाणचं स्थानिक पोलिस स्टेशन) पाठवला आहे. सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक परदेशात राहतात, ते आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील. त्यामुळे सायरस यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.

First published:

Tags: Live video, Ratan tata, Road accident, Tata group