मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती सायरस मिस्त्रींची मर्सिडीज; ती बचावली मात्र...

मुंबईतील महिला डॉक्टर चालवत होती सायरस मिस्त्रींची मर्सिडीज; ती बचावली मात्र...

सूर्या नदीचे जुने आणि नवे असे दोन ब्रीज आहेत. नवा ब्रीज जेथे सुरू होतो, तेथील डिव्हायडरला ही कार धडकली.

सूर्या नदीचे जुने आणि नवे असे दोन ब्रीज आहेत. नवा ब्रीज जेथे सुरू होतो, तेथील डिव्हायडरला ही कार धडकली.

सूर्या नदीचे जुने आणि नवे असे दोन ब्रीज आहेत. नवा ब्रीज जेथे सुरू होतो, तेथील डिव्हायडरला ही कार धडकली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवरेवरील पालघर येथे हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय मिस्त्री मर्सिडीज कारने प्रवास करीत होते. कासाजवळ कार रोडच्या डिव्हायडरला धडकली. यानंतर मर्सिडीज कारचा एअरबॅग उघडला. मात्र मिस्त्रीसह दोघांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये एकूण चारजणं प्रवास करीत होते.

पोलिसांनी मर्सिडीज कारमधील प्रवाशांची सविस्तर माहिती घेतली आहे. या अपघातात सायरस मिस्त्रींसह जहांगीर दिनशा पंडोले यांचाही मृत्यू झाला आहे. त्याशिवाय डॉक्टर अनायता पेडोले आणि दरीयस पंडोले जखमी झाले आहेत. अनायता पंडोले मुंबईत डॉक्टर आहेत. त्या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्याच मर्सिडिज कार ड्राइव्ह करीत होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Video : चेंदा-मेंदा झालेली कार, रस्त्यावर सायरस मिस्त्रींचा मृतदेह; पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य

रुग्णालयात मिस्त्रींना मृत घोषित केलं...

पालघरमध्ये पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं की, मिस्त्री ज्या कारने प्रवास करीत होते, त्याचा नंबर MH-47-AB-6705 नंबर आहे. हा अपघात दुपारी साधारण साडे तीन वाजता अहमदाबादहून मुंबईच्या रस्त्याने सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकीचे दोघे जखमी आहेत. महिला कार चालवत होती, ती जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त गाडीत कोणकोण होतं?

सायरस मिस्त्री त्यांच्या महागड्या मर्सिडीज कारने प्रवास करत होते. कारमध्ये त्यांच्यासह चौघेजणं होते. यामध्ये स्वत: सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोले यांचा मृत्यू झाला आहे. तर अनायता पंडोले (महिला) कार चालवित होत्या. यांच्यासह दरीयस पांडोलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोले यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Ratan tata, Road accident, Tata group