जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शिवसेना 'कोसळली' अन् बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले, VIDEO

शिवसेना 'कोसळली' अन् बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाडही कोसळले, VIDEO


गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑगस्ट : शिवसेनेमध्ये (shivsena) बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहात झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही निर्णय घेतला असं बंडखोर सांगत आहे. मात्र, शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ असलेले गुलमोहराचे झाड कोसळल्याची घटनासमोर आली आहे. विशेष म्हणजे, हे झाड बाळासाहेबांनीच लावलं होतं. मुंबईमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. पुढील दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अशातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ असलेले गुलमोहराचे झाड कोसळले आहे. रविवारी मध्यरात्री हे गुलमोहराचा झाल उन्मळून पडले. मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे झाड कोसळले असल्याची माहिती समोर आली.

गुलमोहराचे जे झाड कोसळले ते बाळासाहेबांनीच लावलेले होते. झाड कोसळल्यामुळे स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पाहणी करता दाखल झाल्या आहेत. पालिकेचे कर्मचारी स्मृतीस्थळावर दाखल झाले आहे. कोसळले झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. ( VIDEO: कोण आमिर खान? मी ओळखत नाही, कारण…;अन्नू कपूर यांच्या त्या विधानाने खळबळ ) विशेष म्हणजे, एकीकडे बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना सारखे वटवृक्ष उभे केले. आज त्याच शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला असून भाजपसोबत सरकारही स्थापन केले आहे. बंडखोर गटाकडून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्नच उपस्थितीत झाला आहे. अशातच बाळासाहेबांनी लावलेले गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याची घटना समोर आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात