जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: कोण आमिर खान? मी ओळखत नाही, कारण...; अन्नू कपूर यांच्या त्या विधानाने खळबळ

VIDEO: कोण आमिर खान? मी ओळखत नाही, कारण...; अन्नू कपूर यांच्या त्या विधानाने खळबळ

VIDEO: कोण आमिर खान? मी ओळखत नाही, कारण...; अन्नू कपूर यांच्या त्या विधानाने खळबळ

बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर नेहमीच आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अन्नू कपूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 ऑगस्ट-  बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर नेहमीच आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अन्नू कपूर पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी अभिनेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वानांच धक्का बसला आहे. अन्नू कपूर यांनी आमिर खानबाबत असं काही म्हटलं आहे ज्यामुळे सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत. सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चित्रपटासोबतच अन्नू कपूर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरसुद्धा अभिनय करत आहेत. नुकतंच त्यांची ‘क्रॅश कोर्स’ ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. या वेबसीरिजच्या प्रमोशनदरम्यान अन्नू कपूरला एका पत्रकाराने आमिर खानच्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाबाबत एक प्रश्न विचारला होता. यावेळी अन्नू कपूर यांनी असं काही उत्तर दिलं कि सर्वानांच धक्का बसला आहे. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अन्नू कपूर यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मीडिया उपस्थित आहे. सोबतच अन्नू कपूर यांना विविध प्रश्न विचारण्यात येत आहेत. दरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारत म्हटलं, ‘आमिर खान सरांचा ‘लाल सिंह चढ्ढा’ रिलीज होणार आहे. त्याला मध्येच थांबवत अन्नू कपूर म्हणतात ‘ते काय आहे’? , मी चित्रपट पाहात नाही’

जाहिरात

**(हे वाचा:** Aamir Khan: इथे झालंय आमिरच्या Laal Singh Chaddha चं शूटिंग; रामायणाशी आहे खास कनेक्शन ) त्यांनतर त्यांच्या मॅनेजरनेसुद्धा मध्ये हस्तक्षेप करत ‘नो कमेंट्स’ असं म्हटलं आहे. तर अन्नू कपूर इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे उत्तर देत म्हटलं, ‘मी कोणताही चित्रपट पाहात नाही. ना ओळखीच्या व्यक्तींचा ना अनोळखी व्यक्तींचा. आणि तो कोण आहे मला माहिती नाही’. त्यामुळे मी याबाबत काय बोलणार. अन्नू कपूर यांच्या अशा उत्तराने सर्वानांच चकित केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात