वसई,16 ऑक्टोंबर : महाराष्ट्रात 1165 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज(दि.16) मतदान होत आहे. 18 जिल्ह्यांमधील 82 तालुक्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. दरम्यान राज्यात निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर बोगस मतदान किंवा अन्य कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील वसईच्या शिरवली ग्रामपंचायत मतदानावेळी गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळपासून सुरळीत मतदान सुरू असताना अचानक वार्ड क्रमांक तीनमध्ये बोगस मतदान झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. काथोड लडकू भोमटे (वय 79) यांच्या नावावर अर्जुन लडकू भोमटे यांनी मतदान केल्याची घटना घडली आहे. या दरम्यान शिरवली मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. काथोड भोमटे यांच्या नावावर त्यांच्याच भावाने मतदान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे ही वाचा : 10 वॉर्ड अन् 10 आमदार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन
दरम्यान यावर ग्रामस्थांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांना चांगलच धाऱ्यावर धरलं. हे अधिकारी नेमकं काय करतात असा थेट सवाल केला. यावरून काही काळ वातारवण तंग झाले होते. दरम्यान यावर news18 लोकमतकडून याबाबत विचारणा केली असता. दरम्यान भोमटे यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला मात्र भोमटे यांनी बोगस मतदान झालं नसल्याचे सांगितलं.
शिरवली गावात होत असलेल्या निवडणुकीसाठी 31 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान वसई तालुक्यातील 119 ग्रामंपचायतींमध्ये 269 उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर 24660 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण 47 मतदान केंद्रावर मतदान मतदान होणार आहे. महसूल कर्मचारी 275 कार्यरत आहेत.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता उद्याची ग्रामपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातगेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं एकत्रित महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण राज्यात आजच्या घडीला शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचं एकत्रित सरकार आहे. राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनाचा ग्रामपंचायत निवडणुकीत खरंच परिणाम होतो का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती जागा मिळतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हे ही वाचा : महाराष्ट्रात उद्या 1165 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा, शिंदे-भाजप की मविआ, बाजी कोण मारणार?
या जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान
ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.