मुंबई, 30 ऑगस्ट : मुंंबईतील आरे कारेशेडमध्ये मेट्रो 3 च्या प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला होता. अखेरीस सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांनी मेट्रो 3 ट्रॅकवर आणून दाखवली आहे. हा निर्णय पर्यावरणापेक्षा राजकीय वाद झाला. आमच्या कुणाही करता हा निर्णय इगोचा नाही, मुंबईकरांसाठी हा निर्णय घेतला, असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिलाच कार्यक्रम घेतला आहे. वादग्रस्त ठरलेल्या मेट्रो 3 ला (metro 3 trial run) हिरवा झेंडा दाखवला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची ट्रायल घेण्यात आली आहे. यशस्वीरित्या मेट्रोची चाचणी पार पडली आहे. यावेळी बोलत असताना फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ‘काही लोकं मात्र राजकारण करतात. त्यामुळे मेट्रोचे काम रखडले होते. मागील सरकारमुळे अडथळा आला. जरी कांजुरमार्गला कारडेपो नेला असता तरी आरेला इतर कामांसाठी डेपो निर्माण करावा लागला असता. या ठिकाणची जागा ही मोकळी होत नव्हती. कांजुरमार्ग ही खारफुटीची जागा आहे. आमच्या कुणाही करता हा निर्णय इगोचा नाही, मुंबईकरांसाठी हा निर्णय घेतला, असं म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ( सोनिया गांधींविरोधात आक्षेपार्ह ट्वीट, आमदार अतुल भातखळकरांविरोधात गुन्हा दाखल ) अतिशय ऐतिहासिक हा क्षण आहे. मेट्रो 3 ची यशस्वी चाचणी झाली आहे. आता मेट्रो 3 कुणीही थांबवू शकत नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिले काम केलं, ते मेट्रोच्या कामातील अडथळे दूर केले. जर काही अडचणी आल्या तर त्या दूर करू. कदाचित ही मेट्रो पुढील वर्षी मार्च महिन्यात धावली असती, पण मध्ये वादविवाद झाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय घेतला नसता तर पुढील 4 वर्ष मेट्रो धावलीच नसती. त्यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक फेल गेली असती. त्याचा भार सामान्य मुंबईकरांवर पडला असता. या निमित्ताने मेट्रोच्या कारडेपाचा विवाद झाला तो पर्यावरणापेक्षा राजकीय जास्त झाला, अशी खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली. ‘हा निर्णय पर्यावरणापेक्षा राजकीय वाद झाला. सुप्रीम कोर्टाने आणि अॅपेक्स कोर्टाने मंजुरी दिली. सर्व पर्यावरणाचा विचार करून ही परवानगी दिली. सर्वोच्य न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. १७ लाख लोक जेंव्हा मेट्रोचा वापर करतील. तेंव्हा ७ लाख वाहनं कमी होतील, पर्यावरणास सपोर्ट करणारी मेट्रो आहे, असं यावेळी फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.