मुंबई, 30 ऑगस्ट : शिवसेना आणि काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar ) आपल्या एका ट्वीटमुळे अडचणीत सापडले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यामुळे भातखळकरांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे आपल्या ट्वीटमुळे कायम चर्चेत असतात. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची ईडीच्या मार्फत चौकशी सुरू होती. त्यावेळी अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल ट्वीट केले आहे. चौकशी सुरू असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे सोनिया गांधी या गैरहजेरी राहिल्या होत्या. त्यावर अतुल भातखळकर यांनी ‘ईडी व्हेरियंटट असं ट्वीट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटवर काँग्रेस तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी काँग्रेसचे नेते संदीप उदमले यांनी पुण्यात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी भातखळर यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाजप करणार शिवसेनेची ‘कॉपी’ दरम्यान, शिवसेनेला फोडल्यानंतर आता भाजप सेनेची मोहिम सुद्धा हायजॅक करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेनं राबवलेली ‘गाव तेथे शाखा’ ही मोहीम निवडणुकांमध्ये चांगलीच गाजली होती. आता भाजप सुद्धा गाव तिथे शाखा मोहीम राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे आणि भाजप सरकारने आता आपला मोर्चा शिवसेनेच्या शाखेकडे वळवला आहे. एकेकाळी शिवसेनेच्या शाखांनी महाराष्ट्रात मिळवलेल्या तुफान यशांचा कित्ता गिरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात किमान दोन शाखा येत्या काळात सुरू करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. युवकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा, असे या मोहिमेमागचे ध्येय आहे. शाखा युवकांना आकर्षित करून त्यांच्या शक्तीचा परिवर्तनासाठी उपयोग करणार आहेत. गावातील अन शहरातील प्रत्येक घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या योजनांचा तपशील पोहोचावा, हे या शाखेचे काम असेलच, पण राष्ट्रउभारणीशी युवकांना जोडणे हा शाखेचा प्रमुख उद्देश असणार आहे. याबद्दल नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.